गणेश मंडळांना सहजपणे वीजजोडणी मिळावी याकरीता महावितरणद्वारा विशेष पथकाची स्थापना करण्यात आली असून हे पथक ठिकठिकाणी गणेश मंडळांना भेटी देवून, वीजजोडणी उपलब्ध करून देण्यास मदत करणार आहेत.
सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सवासाठी वीजसुरक्षेबाबत गांभिर्याने उपाययोजना कराव्यात व सवलतीच्या दरात, वहन आकारासह 4 रुपये 38 पैसे प्रतियुनिट या माफक वीजदराने तात्पुरती व अधिकृत वीजजोडणी घ्यावी तसेच गणेशोत्सवासाठी वीजसुरक्षेबाबत गांभीर्याने उपाययोजना कराव्यात, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. तात्पुरत्या वीजजोडणीच्या बिलींगची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वीजमीटरसाठी घेतलेल्या रक्कमेतील उर्वरित रक्कम गणेश मंडळांना त्वरीत परत करण्याचे निर्देश क्षेत्रिय कार्यालयांना देण्यात आलेले आहेत.
गणेश मंडळांना त्यांच्या दारी आॅन द स्पाॅट तात्पुरती वीजजोडणी गणेश उत्सव काळात, मिळण्यासाठी या पथकांद्वारा ए-1 फाॅर्म गणेश मंडळांना उपलब्ध करून देणे व भरून घेणे, टेस्ट रिपोर्ट उपलब्ध करून देणे व वीजजोडणीसाठी लागणारे शुल्काची डिमांड देणे ई. मदत या पथकाद्वारा करण्यात येणार आहे. वीजेचा अनधिकृत वापर हा धोकादायक असतो, व त्यामुळे जीवित अथवा आर्थिक नुकसान होवू शकते. त्यामुळे वीजेच्या अनधिकृत वापरावर हे पथक विशेष लक्ष ठेवणार आहे. सहा. अभियंता श्री. विनायक चव्हान (7875761332) , वनश्री बेहरम (7875761328) व त्यांचे पथक चंद्रपुरातील गणेश मंळांना वीजजोडणी सहजपणे मिळण्यास सहकार्य करणार आहेत. तसेच स्थानिक नियंत्रण कक्षात 7875761195 या क्रमांकावरही मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे. गणेश मंडळांनी सुरक्षा उपायासह विजजोडणी घेवून अपघाताचे विघ्न टाळून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणद्वारा करण्यात येत आहे.