नागपूर : राज्यात सुखसमृद्धी नांदावी, अशी श्रीगणेशाकडे प्रार्थना केल्याचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
दरवर्षी नितीन गडकरी यांच्याघरी श्रीगणेशाची स्थापना केली जाते. गडकरी यांचे महाल भागातील वाडा आता पाडण्यात आला आहे. त्यांचे निवासस्थान आता पश्चिम नागपुरात आहे. या 'भक्ती' बंगल्यात पहिल्यांदाच 'श्री'ची स्थापना करण्यात आली. श्रीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना गडकरी यांनी राज्यातील जनतेला गणेश चतुर्थीनिमित्त शुभेच्छा दिल्या. राज्यातील सुखसमृद्धी नांदावी. येणारा काळ सर्वांसाठी सुखाचा जावा व राज्यातील सुख नांदावे, अशीच आपली इच्छा आहे. हीच मागणी आपण श्री गणेशाकडे केल्याचे त्यांनी सांगितले. राजकीय मुद्यांवर आज बोलणार नसल्याचे स्पष्ट करून गडकरी यांनी राजकीय प्रश्नांना बगल दिली.