तान्हा पोळा कार्यक्रम
भारतीय संस्कृती प्राचीन संस्कृती आहे. परंतु पाश्चिमात्य संस्कृतीचा पगडा वाढत असल्यामुळे भारतीय संस्कृतीचे जतन करण्याची धुरा बालगोपालावर आहे. त्यामुळे बाळगोपाळांनी भारतीय संस्कृतीचे जातन करून प्रत्येक सणामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन आमदार नानाजी शामकुळे यांनी केले. ते बंगालीकॅम्प शांतीनगर येथे आयोजित तान्हा पोळा कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार नानाजी शामकुळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सभापती समाज कल्याण ब्रिजभूषण पाझारे, युवा नेते भाजप मोनू चौधरी, महिला व बालकल्याण सभापती जयश्री जुमडे, झोन सभापती अजय सरकार, नगरसेवक राहुल घोटेकर, माजी नगरसेवक मनोरंजन रॉय, ओबीसी उपाध्यक्ष आकाश खिरे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना आमदार नानाजी शामकुळे म्हणाले कि, आज प्रत्येक बालगोपालांचा पालकांनी नंदी बैल सजविण्यासाठी मदत केली. त्याच प्रमाणे ऱ्हास होणारी भारतीय संस्कृतीची माहिती बालगोपालाना देऊन प्रत्येक सन समारंभामध्ये सहभागी करून प्रोत्साहन करावे असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजन धम्मप्रकाश भस्मे, अमृत गजपुरे, प्रभात मलिक, सचिन दहीकर, योगेश दाजगाये, सुधाकर बोबडे, पवन पिंपरे, संदीप श्रीरामे, शरद वाढरे, गोपाल हरणे, सुरेंद्र थूल यांनी केले.