Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, सप्टेंबर ०३, २०१८

पाठवलेला मेल करता येणार रद्द

वृत्तसंस्था, नवी दिल्ली:
'गूगल'ने आपल्या यूजरसाठी 'Undo Send' नामक नवे फीचर सादर केले आहे. या माध्यमातून यूजरला पाठवलेला मेल रद्द करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. यापूर्वी ही सुविधा केवळ 'जीमेल'च्या 'आयओएस'धारकांसाठीच उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, आता ही सेवा 'अॅण्ड्रॉइड'धारकांसाठीही उपलब्ध झाली आहे. 'अॅण्ड्रॉइड'धारकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात हे फीचर उपलब्ध करण्याची मागणी होत होती. 
बऱ्याच चाचण्यांनंतर दोन वर्षांपूर्वी (२०१६) 'गूगल'ने 'Undo Send' हे फीचर 'आयओएस'धारकांसाठी उपलब्ध करून दिले. या फीचरच्या मदतीने पाठविण्यात आलेले मेल रद्द करण्याची सुविधा देण्यात आली. हे फीचर 'डेस्कटॉप व्हर्शन'प्रमाणे कार्यरत राहणार आहे. 'ई-मेल' पाठवल्यानंतर एक खिडकी उघडणार आहे. या खिडकीवर 'Sending' असे दिसेल. या शिवाय पाठवलेला मेल रद्द करण्याचीही सुविधा दिसेल. ई-मेल गेल्यानंतर 'Undo Send' हा पर्याय दिसण्यास सुरुवात होईल. 'जीमेल'च्या ८.७ या व्हर्शनच्या मदतीने या फीचरचा उपयोग सर्वांना करता येणार आहे. जर हे फीचर दिसत नसेल तर, 'गूगल प्ले स्टोर'वर जाऊन अॅप अपडेट झाले आहे अथवा नाही, हे पाहण्याची आवश्यकता आहे. 
मार्च २००९मध्ये निर्मिती झाल्यानंतर आणि अधिकृतरित्या सादर होईपर्यंत 'जीमेल'तर्फे 'Undo Send'च्या अनेक चाचण्या घेण्यात आल्या. त्यामुळे हे फीचर प्रथमत: २०१५मध्ये वेब व्हर्शनसाठी सादर करण्यात आले. नुकतेच गूगलने 'जीमेल' गोपनीय वापरासाठी (Confidential mode) सादर केले आहे. हे फीचर चालू करताच यूजरने एखाद्याला पाठवलेला ई-मेल ठरावीक कालावधीनंतर आपोआप नष्ट होणार आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.