Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, ऑगस्ट ३०, २०१८

साई मित्र परिवार, कारंजा(घा) चा केरळ पूरग्रस्तांना मदतीचा हात

चंद्रपुर/प्रतिनिधी:

कारंजा येथील अनेक वर्षांपासून समाजसेवेचे ब्रीद घेतलेल्या साई मित्र परिवार गृप तर्फे केरळ राज्यात काही दिवसांपूर्वी आलेल्या महापुराने विस्कळीत झालेल्या जनजीवनाला पुन्हा नवसंजीवनी देण्यासाठी समाजसेवी युवकांद्वारे माणुसकीचा आधार देत मदतनिधी संकलनाचे कार्य दि.२४/०८/२०१८ ते दि. २७/०८/२०१८ राबविण्यात आले. या काळात युवकांनी कारंजा परिसरातील सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालयांना तसेच गावातील नागरिकांना भेटी देऊन केरळ येथील परिस्थिती समजावून सांगून पूरग्रस्त लोकांच्या मदतीकरिता शक्य तेवढा निधी देण्याची विनंती केली व तेवढाच प्रतिसाद लोकांनी दिल्याने एकूण १४,९५०/-(अक्षरी रुपये चौदा हजार नऊशे पन्नास फक्त) एवढा निधी जमा झाला.
हा निधी जरी तुलनेत कमी जरी वाटत असला तरी माणुसकीचा विचार करता पैशापेक्षाही मनाची मदत व लोकांच्या मनात आपल्या पूरग्रस्त बांधवांसाठी असलेली कळवळ या निमित्ताने दिसून आली.
हा निधी सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालय, यवतमाळ येथील थेट केरळ राज्यात टीम राहत मिशनद्वारे कार्यरत असलेल्या एकूण ५० आजी-माजी विद्यार्थी ज्यात आपल्या महाराष्ट्रातील ३५ युवक व १५ युवतींचा समावेश आहे त्यांना हा निधी पाठविण्यात आला. 
हे युवक सध्या तेथे सक्रिय कार्यरत असल्याने त्यांच्या मदतकार्याला अजून पाठबळ मिळण्यासाठी हा निधी थेट केरळ राज्यात पाठविण्यात आला.
साई मित्र परिवार कारंजा परिसरातील सर्व सन्माननीय नागरिकांनी माणुसकीच्या या कार्याला मदत केल्याबद्दल सलाम करतो व भविष्यात सुद्धा आपणा सर्वांपासून सहकार्य असेच लाभत राहील अशी अपेक्षा करतो.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.