वर्धा/प्रतिनिधी:
वर्धा जिल्हातील पारडी,रिधापुर शिवारात अस्वलाचा धुमाकूळ आज मौझा पारडी येथील श्री प्रभाकर रामराव सरोदे वय 55 धंदा शेती यांच्या जवळ 7एकर कोरडवाहू शेती रिधापुर शिवारात असून सदर शेतकरी आज पत्नी सोबत शेतात गेले असता शेतात अचानक पणे अस्वल अंगावर हल्ला करण्याकरिता धावून आली आणि प्रभाकर सरोदे यांना गंभीर रित्या झखमी केले,सोबत असलेली पत्नी शोभाबाई प्रभाकर सरोदे यांच्या आरडाओरडा केल्याने शेजारी असलेले शेतकरी धावून आले आणि झखमी प्रभाकर यांचा प्राण वाचविण्यास यश आले,सदर प्रकरणाची माहीत वन विभाग तळेगाव यांना देताच घटनास्थळी वनविभाग ची गाडी पाठून झखमी इसमास गव्हमेंट मेडिकल कॉलेज नागपूर येथे उपचाराकरिता हलविण्यात आले. तसेच सुसुंद्रा तालुका कारंजा घाडगे जिल्हा वर्धा येथील राहुल फुले यांच्या माहितीवरून आज दुपारी 3:30 वाजताच्या दरम्यान नाना सामटकर वय 40 धंदा शेती हे आज बैल चारण्याकरिता शेतात गेले असता अचानक नाना सामटकर हांच्या अंगावर अस्वल धावून आली परंतु सुदैवाने इतर शेतकर्यांच्या मदतीने स्वतःचा प्राण वाचविणे शक्य झाले तरी असून अनेक दिवसांपासून अस्वलाचा धुमाकूळ असून कुठलेही उपाययोजना होत नसल्याने अनेक गावा गावात वनविभागविषयी रोष निर्माण होत आहे एकीकडे शेतकरी जगाचा पोशिंदा समजल्या जाते पण शेतकऱ्यांवरच हा अन्याय का हा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये तयार झालेला असून सदर वनविभाग तळेगाव यांनी त्वरित अस्वलाचा बंदोबस्त करावा ही विनंती गावातील लोकांकडून करण्यात आली आहे.