Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, ऑगस्ट १५, २०१८

महाराष्ट्रातील ४ तुरूंग कर्मचाऱ्यांना सुधारक सेवा पदक जाहीर

देशभरातील 36 तुरूंग अधिकारी-कर्मचाऱ्यांना सुधारक सेवा पदके जाहीर
नवी दिल्ली:
देशभरातील 36 तुरूंग अधिकारी-कर्मचाऱ्यांना सुधारक सेवा पदके जाहीर झाली असून यामध्ये महाराष्ट्रातील 4 तुरूंग कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला देशभरातील उत्कृष्ट कार्य केलेल्या 36 तुरूंग अधिकरी-कर्मचाऱ्यांना सुधारक सेवा पदके जाहीर झालेली आहेत. यात 5 तुरूंग अधिकाऱ्यांना असामान्य सेवेसाठी राष्ट्रपती सेवा पदक तर उल्लेखनीय सेवेसाठी 31 तुरूंग अधिकारी-कर्मचाऱ्यांना सुधारक सेवा पदके जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील 4 तुरूंग कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे सुभेदार कलप्पा मलकप्पा कुंभार, मुंबई जिल्हा महिला कारागृहाचे हवालदार कैलास शालिक बाऊस्कर, नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे शिपाई संजय राजारामजी तलवारे, शिपाई राजू विठ्ठल हाटे या तुरूंग कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.