Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जुलै २१, २०१८

मोहन कलेगूरवार भाजपा विध्यार्थी आघाडीचे नवे जिल्हाध्यक्ष

चंद्रपूर/प्रतिनिधी:
                    राजूरा येथील भारतीय जनता पार्टी विध्यार्थी आघाडीचे शहर अध्यक्ष मोहन कलेगूरवार यांची नुकतीच विध्यार्थी आघाडीच्या  जिल्हाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली. यावेळी हरीश शर्मा नगराध्यक्ष तथा जिल्हा अध्यक्ष भाजपा (ग्रामीण ) ब्रीजभुशन पाझारे सभापति समाजकल्याण विभाग जी.प. चंद्रपुर हीरामन खोब्रागडे जिल्हाध्यक्ष भाजपा दलित आघाडी आशीष देवतले जील्हामहामंत्री भाजयूमो आदींसह कार्यकर्त्यांची उपस्तीती होती. हरीश शर्मा यांनी मोहन कलेगूरवार यांना नियुक्ति पत्र दिले.
मोहन हे श्री शिवाजी महाविद्यालय राजूरा येथील माजी  छात्रसंघ सचिव आहेत.तसेच गोन्ड्वाना विद्यापीठ येथून त्यांनी नुकतीच पत्रकारीतेत विद्यापीठातून तिसरा मेरिट येण्याचा मान मिळवला. महाराष्ट्र राज्य मादगी समाज संघटनेचे ते तालुका सचिव आहेत.या व्यतिरिक्त न्रूत्य नाटक व शैक्षणिक क्षेत्रात त्यांना आवड आहे. मोहन कलेगूरवार यांच्या विध्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पदि निवडझाल्याबद्दल केंद्रीय ग्रूह राज्यमंत्री हंसराज अहिर अर्थ नियोजन वन मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आमदार अँड संजय धोटे भाजपा चंद्रपुर लोकसभा क्षेत्र विस्तारक तथा राजूरा विधानसभा प्रमूख खुशाल बोन्डे, जिल्हा उपाध्यक्ष अरुण मस्की, जिल्हा सचिव मधुकर नरड जी प सदस्य तथा भाजपा तालुका अध्यक्ष सुनील उरकुडे, महामंत्री प्रशांत घरोटे, दिलीप वान्ढरे, भाजपा शहर अध्यक्ष बादल बेले, नगरसेवक राधेश्याम अडानिया, प्रीति रेकलवार, ऊज्वला जयपूरकर, भाजयूमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे आदिंनी अभिनंदन केले.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.