Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जुलै २०, २०१८

पारशिवनीत ४ बकर्‍यांची शिकार

रामटेक ( तालूका प्रतिनिधी )
गेल्या चार महिन्यांपासून पारशिवनी शहरात हिंसक पशु भरवस्तीत येऊन पाठीव प्राण्यांची शिकार करीत आहे. शिकार होण्याची ही पाचवी घटना असून, शिकारीच्या घटनेत दिवसेंदिवस सतत वाढ होत आहे. बुधवारी (१८ जुलै) पहाटे प्रभाग ४ मधील उमेश बापुराव केळवदे व अरविंद मेर्शाम पारशिवनी यांच्या राहते घरी असलेल्या गोठय़ातील बकर्‍या हिस्त्र पशुने शिकार केल्याची घटना उघडकीस आली.
घराशेजारी असलेल्या गोठय़ातील बकर्‍यांना जंगली हिंसक प्राणी आपली भूक भागविण्याकरिता शिकार करीत आहे. रात्रीच्यावेळी शांत असलेल्या भरवस्तीतील पाळीव प्राण्यांची शिकार करणे हा त्यांचा नित्याचाच नियम झाला आहे. तर लहान मुले - बाळे घरोघरी असल्याने कोणत्याही क्षणी मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील अनेक महिन्यांपासून वनविभागाच्या अधिकार्‍यांना या घटनेची माहिती असून, देखील या हिस्त्र पशुला पकडण्यासाठी बेस उपाय योजना केली नसल्याने शिकारीच्या घटनात सतत वाढ होत आहे. 
परिणामी, येथील नागरिक दहशतीत जीवन व्यापन करीत आहे. वनविभागाविरोधात तीव्र असंतोष निर्माण होत असल्याने याचा कोणत्याही क्षणी भडका उडू शकतो. वेळीच घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वनविभाचे योग्य ती उपाय योजना करून हिस्त्र पशुला जेरबंद करण्याची व झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी शहरवासीय करीत आहे. शिकारीच्या घटनांमध्ये सतत वाढ होत असताना वनविभागातील अधिकारी झोपले आहेत काय? तसेच मनुष्यहानी झाल्यास वनविभागाविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाईल. अशाप्रकारची दुसरी घटना घडु नये, करीता उपाययोजनाची वनविभागाने काळजी घेऊन हिस्त पशुला पकडण्यात यावे. अन्यथा, वनविभागाच्या कर्मचार्‍यांना शहरात भटकू न देता नागरिक हिस्त्रपशुला बंदोबस्त लावतील, असा माजी सरपंच दीपक शिवरकर यांनी इशारा दिला. वन परिक्षेत्र अधिकारी पारशिवनी यांना याबाबत विचारणा केली असता, आम्ही या हिंसक पशुच्या मार्गावर असून, कॅमेरे लावत असतो. पण, हा पशु शोधूनही दिसत नसल्याने पकडणार कसे? तरीही कर्मचार्‍यांना रात्रीच्यावेळी गस्त घालण्याचे आदेश दिले आहे. हिंसक प्राणी जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत यादरम्यान झालेल्या नुकसानीची भरपाई अवश्य दिल्या जाईल, अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.