Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जुलै १३, २०१८

कृषीपंपांना वीजजोडणी देण्यासाठी महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राद्वारे शेतकऱ्यांशी संपर्क

अक्षांश-रेखांशच्या मदतीने देण्यात येणार वीजजोडणी 
चंद्रपूर/प्रतिनिधी:
३१ मार्च २०१८ अखेर कृषीपंपासाठी प्रलंबित असलेल्या कृषीपंप ग्राहकांना नजिकच्या उच्चदाब वीज यंत्रणेतून वीजजोडणी देण्याची प्रक्रिया महावितरणने सुरू केले आहे. यासाठी कृषीपंप ग्राहकांच्या स्थळाचे अशांश-रेखांश याची आवश्यकता आहे व ते मिळविण्यासाठी महावितरण प्रयत्नशील आहे. ही माहिती लवकर मिळण्यासाठी ज्या ग्राहकांनी महावितरणकडे आपला मोबाईल नंबर नोंदविला आहे अशा ग्राहकांना महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राद्वारे मोबाईलवर संपर्क साधला जात आहे.
महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहकसेवा केंद्रांद्वारे पाठविलेल्या एसएमएस व सूचनेनुसार शेतकऱ्यांनी https://goo.gl/GtMGVD यावर क्लिक करून फोटोद्वारे कृषीसंचाच्या मांडणीची अक्षांश व रेखांशची माहिती पाठवावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे. आतापर्यन्त राज्यातील ८६२ कृषीपंपग्राहकांनी कृषीसंचाच्या मांडणीच्या फोटोची माहिती यशस्वीरित्या दिलेली आहे. 
ज्या शेतकऱ्यांनी आपले मोबाईल क्रमांक महावितरणकडे नोंदविले नसतील त्या शेतकऱ्यांनी आपले मोबाईल क्रमांक महावितरणकडे टोल फ्री क्र. १८०० १०२ ३४३५ व १८०० २३३ ३४३५ यावर नोंदवावेत, असेही आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.