चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील मेंडकी येथे पुरात अडकलेल्या ७ महिलांना काढण्यात प्रशासनाला यश आले आहे ,सोमवारी सकाळी सतत सुरू असलेल्या पावसामुळे जिल्हयातील बरेचसे नदी नाले यांना पुर आला असुन नदी नाले व जवळील गावातील जनमान विस्कळीत झाले. अश्यातच मेंडकी येथील वाहतुक ठप्प झाली. मेंडकी येथील सात महीला शेतात रोवणी करण्यासाठी गेल्या होत्या तितक्यात पावसाचा जोर वाढला. त्यामुळे जवळच्या नाल्याच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने या सर्व महिला पुराच्या पाण्यात अडकल्या. ह्या घटनेची माहिती पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर कायरकर यांना मिळताच त्यांनी घटनास्थळाकडे जाऊन पाहणी केली. व तात्काळ ब्रह्मपुरीचे तहसीलदार विद्याधर चव्हाण,ब्रम्हपुरी तहसिल कार्यालयाचे उपविभागीय अधिकारी उमेश काळे,उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत परदेशी,पोलीस निरीक्षक विलास चौव्हान,पोलीस उपनिरीक्षक अश्विन खेडीकर,यांना दूरध्वनीवरुन संपर्क करून या घटनेची माहिती दिली व तात्काळ महिलांना बाहेर काढण्यासाठी मदत कार्य करण्याची विनंती केली.तहसीलदार विद्याधर चव्हाण सकाळी 11 वाजता घटनास्थळी दाखल झाले . व तीन तासाच्या अथक परिश्रमानंतर महिलांना पुराच्या पाण्यातुन काढण्यात यश आले. यात वनिता राऊत,बहीनाबाई ठाकुर,महानंदा गजभिये,विमल अवरासे,यशोदा मेश्राम,कल्पना ठाकुर,सुगंधा शेंडे ह्या सातही महीलाना पुरातुन सुखरुप बाहेर काढून त्यांना वाचवण्यात यश आले आहे.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
सोमवार, जुलै १६, २०१८
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
- Blog Comments
- Facebook Comments