Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जून १२, २०१८

महावितरणाचे वीजमीटर फॉल्टी असल्याचा कांगवा करत वीज ग्राहक परिमंडळ कार्यालयासमोर बेमुदत उपोषणावर

ग्राहकाचा तक्रार निवारण मंचात जाण्यास नकार
चंद्रपूर/प्रतिनिधी:
महावितरण कंपनीने वीज मीटर फॉल्टी लावल्याने चुकीचे बिल येत आहे. यासंदर्भात वारंवार तक्रार करूनही दुरूस्ती करण्यात आली नाही, असा आरोप करून स्रेहनगर येथील भाऊराव देवाजी कोरडे यांनी शुक्रवारपासून चंद्रपूर परिमंडळ कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले.
भाऊराव कोरडे यांनी निवेदनात म्हटले की, वीज कंपनीच्या रामनगर वितरण केंद्राने मार्च २०१० ला मीटर लावून दिले. त्या महिन्यापासूनच मीटर फॉल्टी होते. त्यामुळे हे मीटर वेगाने फिरत असल्याने महावितरण कंपनीने जास्तीचे बिल पाठविले. पण, बिलाचा भरणा केला. दरम्यान, वीज मीटर बदलून देण्याची वारंवार मागणी केली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून कंपनीने बिल पाठविणे सुरूच ठेवले. त्यानंतर मीटरची गुणवत्ता चाचणीबाबत माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती मागितली. पण, हा अहवाल देण्यात आला नाही, असा आरोप कोरडे यांनी केला. कंपनीने हा अन्याय दूर करावा, या मागणीसाठी शुक्रवारपासून उपोषण सुरू केले. यासंदर्भात कार्यकारी अभियंता अविनाश कुºहेकर यांना विचारणा केली असता ते म्हणाले, वीजवितरण कंपनीने वीजमीटर टेस्टींग तसेच ऐक्यूचेकद्वारा तपासणी केली. शिवाय वीजनियामक आयोगाकडूनही प्राप्त झालेला वीजमीटर बरोबर म्हणजे तांत्रिकदृष्ट्या योग्य असल्याचा दाखलाही त्यांना देण्यात आला. थकीत वीज बिलापोटी महावितरण कंपनीद्वारा वीजपुरवठा खंडित केल्यावरही कोरडे यांनी स्वत:च वीज यंत्रणेशी छेडछाड करीत परस्पर वीजजोडणी केली. त्यामुळे त्यांच्याविरूद्ध वीजकायदा कलम१३८ अंतर्गत त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. १०० ते १५० असा सरासारी वापर तसेच उन्हाळयात २००ते ३०० युनिटदरम्यान वीजवापर असून महावितरणने कोरडे यांना विनंती करूनही थकीत वीजबिलाचे १६ हजार ५४० रूपये एप्रिल २०१७ ते मे २०१८ असे एकून १४ महिन्यांचे वीजबिल न भरता महावितरणवरच ५३ हजार २६० रुपये असल्याचे पत्र महावितरणला दिले आहे. कोरडे यांनी २९ फेब्रुवारी २०१६ ला मीटर बदलविणे व तपासणीकरीता अर्ज केला. त्यानुसार त्यांच्या समक्ष तपासणी करून मीटर योग्य असल्याचा अहवाल दिला. कंपनीच्या प्रचलित नियमानुसार मीटर तपासणी लॅबमध्ये पाठविण्याकरिता वाणिज्य परिपत्रकाची सत्यप्रतही पाठविली. एमईआरसीच्या मंजुरीप्रमाणे वाणिज्य परिपत्रकाअन्वये कोरडे यांच्या बिलात कोणतीही चूक नसल्याचे कळविले होते. परंतु, तीन महिन्यांचे १ हजार ९१० रूपयांचे संग्रहित परंतु संयुक्तिक वीज बिल भरून त्यानंतरचे संयुक्तिक वीज बिल भरणे बंद केले. उपोषण करून कंपनीला वठीस धरत असल्याची माहिती वीज वितरण कंपनीने दिली.

वीज कंपनीला वेठीस धरण्याचा प्रकार - कुऱ्हेकर
रामनगर वीज वितरण केंद्रातील सहायक अभियंत्यांनी विद्युत कायद्यानुसार १५ दिवसांची विद्युत पुरवठा खंडित करण्याची नोटीस दिली. पण, ग्राहकाचे पूर्ण समाधान व्हावे, या हेतूने पुरवठा खंडित करण्याआधी ग्राहकासमक्ष मीटर तपासणी केली. त्यात मीटर योग्य असल्याचे निष्कर्ष येवूनही कोरडे यांनी बिल भरण्यास नकार दिला. त्यामुळे २९ सप्टेंबर २०१७ ला ग्राहकासमक्ष पुरवठा खंडितकरण्यात आला. बिल भरल्यानंतरच पुरवठा सुरळीत करण्याचे वीज वितरण कंपनीने कळविले होते. एवढेच नव्हे तर महावितरणने कोरडे यांनी स्वत: व जाणकार प्रतिनिधींसमक्ष मिटरची पुन्हा तपासणी केली जाईल व त्यासाठी एक दिवस अगोदर भेटून कळवावे, असे पत्र देण्यात आले होते. पण या पत्राची दखल घेतली नाही. विभागीय व उपविभागीय कार्यालयात हजर झाले नाही. दरम्यान, ४ जून २०१८ ला कोरडे यांच्या वीज पुरवठ्याची पथकाने पाहणी केली असता त्यांनी अवैधरित्या वीज जोडणी करून स्वत:चा पुरवठा सुरू केल्याचे तपासणीत आढळले. त्यामुळे ५ जून २०१८ ला कायमस्वरूपी खंडित करून ९ जून २०१८ ला वीजकायदा २००३ च्या कलम १३८ नुसार शहर ठाण्यात कोरडे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती कार्यकारी अभियंता अभियंता कुऱ्हेकर यांनी दिली.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.