Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जून १९, २०१८

२० जूनला दक्षिण आणि पश्चिम नागपुरातील वीज पुरवठा राहणार बंद

नागपूर/प्रतिनिधी:
शहरात होणाऱ्या विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महावितरणकडून येत्या बुधवारी, २० जूनला दक्षिण आणि पश्चिम नागपुरातील ५४ वीज वाहिन्यांची देखभाल-दुरुस्ती करण्यात येणार असून यासाठी दिवसभर विविध भागात वीज पुरवठा बंद ठवण्यात येणार आहे.
महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सकाळी ७ ते ११ या वेळेत दक्षिण अंबाझरी रॊड,बजाजनगर,चित्रकला महाविद्यालाय, अभ्यंकर नगर,माधव नगर,श्रद्धानंद पेठ, शंकर नगर,एलएडी कॉलेज चौक ,सकाळी ८ ते ११ या वेळेत नागपूर विद्यापीठ परिसर, हिल टॉप,अंबाझरी उद्यान, वर्मा ले आऊट, हिंदुस्थान कॉलनी अमरावती रोड,पांढराबोडी. मरारटोली, तेलंगखेडी,गोंडबस्ती, रामनगर गिरीपेठ,गोरेपेठ,टिळक नगर, लक्ष्मीभवन चौक, धरमपेठ, आंबेडकर नगर,शिवाजी नगर, सुजाता ले आऊट, स्वावलंबी नगर,इंद्रप्रस्थ नगर,संचयनी कॉम्प्लेक्स,प्रताप नगर, विद्या विहार, टेलिकॉम नगर,रवींद्र नगर, एकात्मता नगर,दादाजी नगर,पडोळे ले आऊट, राधेश्याम नगर, दीनदयाल नगर, गोपाळ नगर,सोमलवाडा,सावित्रीविहार, राजीवनगर,वर्धा रोड परिसर, मुळीक कॉम्प्लेक्स,विदर्भ प्रीमियर कॉलनी येथील वीज पुरवठा बंद राहणार आहे. सकाळी ९ ते ११ या वेळेत धरमपेठ भगवाघर, तलमले ले आऊट, भांगे विहार,शहाणे ले आऊट, सुमित नगर, कामगार कॉलनी, बंडू सोनी ले आऊट, कॉसमॉस टाउन, शास्त्री ले आऊट, अग्ने ले आऊट, खामला सिंधी कॉलनी, सावरकर नगर, व्यंकटेश नगर,त्रिशरण नगर, जयताळा, भेंडे ले आऊट, लोकसेवा नगर, प्रियदर्शनी नगर,पन्नास ले आऊट, सोनेगाव, एचबी इस्टेट, सहकार नगर,जयप्रकाश नगर,राहुल नगर, या भागातील वीज पुरवठा बंद राहील. सकाळी ११ ते १२ या वेळेत नरकेसरी ले आऊट, संताजी कॉलेज, नीरी,लक्ष्मी नगर,वसंत नगर,ऑरेंज सिटी हॉस्पटिल, देव नगर, रामकृष्ण नगर,साई मंदिर परिसर या परिसरातील वीज पुरवठा बंद राहणार आहे.
दुपारी १२ ते २ या वेळेत नवजीवन सोसायटी, प्रगती कॉलनी, गजानन नगर,छत्रपती नगर, जेल परिसर, प्रशांत नगर, समर्थ नगर, चुना भट्टी, पांडे ले आऊट, स्नेह नगर,मालवीय नगर,सीता नगर,पंचदिप नगर या भागातील वीज पुरवठा बंद राहील, दुपारी २ ते ३ या वेळेत शासकीय विज्ञान संस्था, बर्डी मेन रोड, टेम्पल बाजार रोड,महाजन मार्केट, मॉरिस कॉलेज टी पॉईंट, शासकीय मुद्रणालय तर दुपारी ४ ते संध्याकाळी ५ या वेळेत मुंजे चौक, झाशी राणी चौक, हनुमान गल्ली, नेताजी मार्केट परिसर, शनी मंदिर, कुंभार टोळी,तेलीपुरा, कोष्टीपुरा, विद्यापीठ ग्रंथालय, कॅनॉल रोड रामदासपेठ, पंचशील चौक येथील वीज पुरवठा बंद राहणार आहे. महावितरणकडे मोबाईल क्रमांक नोंदणी केलेल्या वीज ग्राहकांना वीज पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती एसएमएस च्या माध्यमातून मिळणार आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.