कोंढाळी वन परिक्षेत्राच्या शेकापुर बीट कक्ष क्र 126 संरक्षित वना मधील दोन नील गाय (मादी)व गावकर्यांच्या सात बक-या गावालगतच्या नाल्याचे पानी पेल्यामुळे मृत पावल्याची घटना शेकापुर गावा नजिक 20मे रोजी पहाटे पाच ते सकाळी दहा वाजता चे दरम्यान घडली.या बाबद ची माहिती कोंढाळी वन परिक्षेत्र अधिकारी एफ आर आजमी यांना मिळाली. तेंव्हा वन अधिकार्यांनी शेकापुर गाठून मृत दोन निल गायी व शेकापुर चे विठ्ठल लक्षमन चौधरी यांच्या तिन बकर्या व सुधाकर किसन कोडापे यांचे चार बकर्या एकूण सात बक-यांचा घटणास्थळ पंचनामा करून मृत वन्य प्राणि व बकर्रांचे शवविच्छेनास पशुधन अधिकार्यानां पाचारन केले या प्रसंगी पशुधन अधिकारी डाॅ सुचीता ऊईके यांनी मृत दोन निलगाय व सातही बकर्यांचे शव विच्छेदन केले. या जनावरांचे मृत्यू चे कारन विचारल्यावर डाॅ सुचिता उईके यांनी सांगितले की ही जनावरे विषयुक्त पाणी पेल्याने मृत झाली पण ते विषयुक्त द्रव्र की पदार्थ या बाबद विसरा तपासनी अहवाल आल्यावर याची माहिती देता येईल, या प्रकरनी वन अधिकारी एफ आर आझमी यांनी सांगितले की या प्रकरनी अज्ञात व्यक्ति विरूध्द पी यु आर दाखल केल्या जाईल , या कार्यवाहित उपवन अधिकारी आर एस डाखोळे डि एस ढवळे, वनरक्षक मनोज भस्मे, प्रियंका आवारी, नेहा जयवार यांनी दोन्ही निल गायींना अग्नी दिली.
SHARE THIS