चंद्रपूर/रोशन दुर्योधन:
रेल्वे इंजीनचे काम करत असतांना विद्युत तारेचा स्पर्श होऊन चंद्रपूर येथील महाऔष्णिक विद्युत केंद्रातील कंत्राटी कामगार प्रविन नामदेवराव बोदे,वय ३० रा.घुग्गुस हा गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडल. हा जखमी कामगार साई उर्जा इंडो व्हेन्चर प्रा लीमीटेड.सी.टी.पी.एस मधे (मित्तल )ह्या कंत्राटदाराचा असल्याची माहिती आहे .सध्या कामगाराची प्रकृती चिंताजनक असून त्याला ऊपचारासाठी चंद्रपूर येथील पालीवाल यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.घटना स्थळावर काम सुरु असतांना कंपनीचे व्यवस्थापक तिवारी हे तेथे उपस्थित असल्याचे बोलले जात आहे.सध्या या कामगाराची प्रकृती चिंताजनक असून त्याला नागपूर येथे हलविण्यात येऊ शकते असे भारतीय मजदूर संघाच्या चंद्रपूर येथील पधाधिकाऱ्यांकडून बोलल्या जात आहे.