परिमंडळ स्तरावर काम करतांना निकोप स्पर्धेतून महावितरणच्या अभियंता, अधिकारी व कर्मच्याऱ्यानन्द्वारा
गुणवत्तापूर्ण सेवा देण्यात येवून महावितरणचा नावलौकीक वाढण्यास मदत होण्यासाठी नागपूर विभागाचे प्रादेशिक संचालक श्री. भालचंद्र खंडाईत यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री. दिलीप घुगल यांनी, सन 2017-2018 या आर्थिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अभियंता,अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करून त्यांचे धैर्य वाढविले. नुकत्याच पार पडलेल्या परिमंडळ आढावा बैठकीत हा गौरव करण्यात आला.
वीजेसारखी महत्वाची सेवा प्रदान करतांना तसेच ग्राहकांच्या अपेक्षा वाढलेल्या असल्याने महावितरणचे अभियंता, अधिकारी व कर्मचारी हे कायम तणावात काम करीत असतात. चंद्रपूर परिमंडळातील चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्हयात काम करतांना महावितरणचे अभियंता कर्मचारी यांना चंद्रपूरचे कधी कडक उन्ह सोसावे लागते तर कधी गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त व दुर्गम भागात वीजपुरवठा करण्यास दुर्गम वाट धरावी लागते. वादळ, वारे, पा७स व त्यामुळे उन्मळून पडणारे वीजेचे खांब, तुटणाऱ्या वीजवाहिण्या यामुळे तर त्यांची परीक्षा पाहिली जाते. अशा परिथितीत काम करणाऱ्या अभियंता, अधिकारी, कर्मचारी तसेच वीजबिल वसुली, वीजहानी कमी करणे, व सोबतच महावितरणची आर्थिक, सांघिक बाजू सांभाळणारे लेखा व मानव संसाधन विभागातील अधिकारी, माहिती तंत्रज्ञान विभागातील अधिकारी, स्थापत्य विभागातील अभियंते व कर्मचारी अषा सर्वांचा गौरव मुख्य अभियंता श्री. दिलीप घुगल यंानी केला.
आलापल्ली, गडचिरेालीच्या जंगलात गरीब आदिवासींच्या जीवनात वीजेची गरज पूर्ण करणाÚया आलापल्लीचे कार्यकारी अभियंता श्री. अमित परांजपे यांचा उत्कृष्ट कार्यकारी अभियंता म्हणून गौरव करण्यात आला, प्रणाली विष्लेशक पंकज साटोने व पी.एन.येळणे यांचा उत्कर्ष प्रणाली विषलेशक म्हणून तसेच वीजबिलवसुली, ग्राहकसेवा या मानकांवर उत्कृश्ठ काम करणाऱ्या श्री. सचिन बद्खल व अमर लिखार यांचा उत्कृष्ट उपकार्यकारी अभियंता म्हणून गौरव करण्यात आला. उत्कृष्ट शाखा अभियंता म्हणून- प्रशांत आवारी, विनोद भलमे, अतूल रोडगे, रोजेश कुमार रंगारी, जगदिश माटे, सचिन रणदिवे यांचा गौरव करण्यात आला तसेच जयंत खिरकर, चंद्रकांत सडमेक, कृणाल बागुलकर, विनोद भोयर शैलेश वाशीमकर , मिलींद गाडेगोणे या अति.कार्य. तथा उपकार्य. अभियंत्यांना गौरविण्यात आले . अब्दुल शेख, नटराज थंगवेल, महेश निंदेकर व रविंद्र राउत या लेखा व मा.सं. विभागातील कर्मचार्यांना गौरविण्यात आले.
याच जोमाने 2018-19 या आर्थिक वर्शात अधिक कसोशीने काम करण्याचे मुख्य अभियंता श्री. दिलीप घुगल यांनी सर्वांना निर्देष दिले. याप्रसंगी अधिक्षक अभियंता -श्री.हरीश गजबे, अशोक कार्यकारी अभियंता, प्रणाली विष्लेशक, सर्व उपकार्यकारी अभियंता व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.