Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, एप्रिल २३, २०१८

मुनगंटीवारांची तुलना बाबासाहेबांशी केल्याने ब्रिजभूषण पाझारे विरोधात पोलिसात तक्रार

चंद्रपूर/प्रतिनिधी:
नेहमी वेगवेगड्या कारणाने चर्चेत राहणारे चंद्रपूर जिल्हापरिषदेचे समाजकल्याण सभापती व भाजपचे पदाधिकारी असणारे ब्रिजभूषण पाझारे आणखीन एका नवीन अडचणीत सापडले आहेत,१५/४/२०१८ ला मूल येथील"शाहू फुले आंबेडकर विचारमंच" च्या कार्यक्रमात डाॅ. आंबेडकर यांचे प्रमाणेच सुधीर  मुनगंटीवार काम करीत असून सुधीरभाऊत मला बाबासाहेब आंबेडकर दिसतात" असे वादग्रस्त वक्तव्य केले.या विधानामुळे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान झाला असून, त्यांचेवर कारवाई करावी अशी मागणी विदर्भ राज्य आघाडीचे मूल तालुका अध्यक्ष गौरव शामकुळे यांनी मूल पोलीस स्टेशनमध्ये केलेल्या तक्रारीत केली आहे.
पाझारे हे अर्थमंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे कट्टर समर्थक आहे.गेल्या अनेक वर्षांपासून ते भाजपचे सक्रिय कार्यकर्ते देखील आहे मात्र पाझरेच्या या वक्तव्याचा हा व्हिडीओ संपूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल झाला असून आता त्यांच्यावर विविध स्तरावरून टीकेची झोड उठली आहे, तसेच वीराचे मूल तालुका अध्यक्ष गौरव शामकुळे यांनी केल्या तक्रारीत असे म्हटले आहे कि कार्यक्रमाचे स्वरूप पाहता ब्रिजभूषण पाझारे यांना मुनगंटीवार यांच्याबद्दल बोलण्याची आवश्यकता नव्हती, मात्र जाणीवपूर्वक दलितांच्या भावनांना ठेच पोहचविण्यासाठी त्यांनी असे व्यक्तव्य केले असल्याने दलितांमध्ये यामुळे प्रचंड असंतोष पसरलेला असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. या संपूर्ण प्रकारामुळे पाझरे चांगलेच अडचणीत सापडल्याचे चित्र दिसत आहे.

माझा बोलण्याचा उद्देश तसा नसून त्याचा चूकीचा अर्थ काढून विरोधक माझ्यावर निशाणा साधत आहे,मी बाबासाहेबांचे काम समजून घेतले आहे,बाबासाहेब ज्या प्रमाणे अहो रात्र काम करत होते त्याच प्रमाणे सुधीर मुनगंटीवार देखील काम करत आहे.असा माझ्या बोलाचाच उद्देश होता मात्र विरोधक याला जास्त प्रसिद्धी देत आहेत 
ब्रिजभूषण पाझारे
जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती चंद्रपूर 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.