Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, एप्रिल २८, २०१८

पोलीस भरतीत बनावटी प्रमाणपत्रे सादर करणाऱ्या चंद्रपुरातील दोघांना अटक

नागपुर/विषेश प्रतिनिधी:
पोलीस खात्यात भरती होण्यासाठी बनावटी प्रमाणपत्र सादर करणाऱ्या तसेच ते प्रमाणपत्र विकणाऱ्या चंद्रपूरच्या दोघांना मानकापूर पोलिसांनी अटक केली आहे. मोसीम नईम शेख रा.जटपुरा गेट, सपना टाकीस व स्वप्नील पोडगले रा. चंद्रपूर असे या आरोपींची नावे आहेत. मोसीन हा हँडबॉल पटू असून त्याने विविध ठिकाणी राष्ट्रीय स्पर्धा गाजविल्या आहेत. तर पोलीस होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या स्वप्नीलने नागपूर ग्रामीण पोलीस भरतीत सर्व चाचण्या पार पडल्या होत्या. शासकीय नोकरीत स्पोर्ट कोट्यातून राष्ट्रीय स्पर्धा खेळणाऱ्या क्रीडापटूला वेगळे गुण मिळतात. त्यामुळे स्वप्नील ने मोसीन ला असे एखादे प्रमाणपत्र जमवून देण्याची विनंती केली होती. मोसीनने कलरप्रिन्ट च्या साहाय्याने ४५ व्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे प्रमाणपत्र बनविले. हे प्रमाणपत्र स्वप्नीलने नागपूर ग्रामीण पोलीस भरतीच्या वेळेस सादर केले. त्याची पळताळणी क्रीडा संचालक कार्यालयातून झाली तेव्हा ते प्रमाणपत्र बनावट असल्याचे उघड झाले. त्यानंतर मानकापूर पोलिसांनी स्वप्निलच्या माध्यमातून मोसीनला नागपुरात बोलावून घेतले.प्रमाणपत्र विकत पाहिजे असेच त्याला सांगण्यात आले होते. त्यामुळे तो नागपुरात पोहोचला.पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने घरीच क्रीडा संचालकांचे कार्यालय उघडून अनेकांना बनावट स्पोर्ट सर्टिफिकेट तयार करून दिले असल्याचे सांगितले आहे. पुढील तपास नागपूर पोलीस करीत आहे .


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.