Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, एप्रिल २४, २०१८

वर्षभरात ३० कोटीच्या वीजचोरीचा भांडाफ़ोड

नागपूर/प्रतिनिधी:

महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रा अंतर्गत कार्यरत असलेया सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाच्या भरारी पथकांनी आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये तब्बल 29 कोटी 59 लाख 76 हजार रुपये मुल्यांकनाच्या वीजचो-या उघडकीस आणल्या असून त्यापैकी 20 कोटी 14 लाख 21 हजार रुपयांची वसुली करण्यात यश मिळविले आहे. भरारी पथकाच्या वर्षभर चाललेल्या या कारवाईमुळे वीजचोरांना अटकाव करण्यात महावितरणला मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे.
                 महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे कार्यकारी संचालक अरविंद साळवे आणि नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांच्या मार्गदर्शनात नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी उपसंचालक मंगेश वैद्य यांच्या नेतृत्वात विदर्भातील अकराही जिल्ह्याच्या भरारी पथकांनी 2017-18 या आर्थिक वर्षात तब्बल 9320 वीज जोडण्यांची तपासणी केली, या मोहीमेत भरारी पथकांनी वीज वाहिनीवर थेट आकडा टाकून होत असलेल्या वीजचोरीची 3689 प्रकरणे उघडकीस आणली याशिवाय भारतीय विद्युत कायदा 2003 च्या कलम 135 आणि 138 अन्वये मीटरमध्ये फ़ेरफ़ार अथवा अन्य प्रकारांनी होत असलेल्या 10 कोटी 96 लाख 80 हजार रुपये मुल्यांकनाच्या वीजचोरीची 2482 प्रकरणे उघडकीस आणली. यात अकोला मंडलातील 243, अमरावती 229, बुलढाणा 200, भंडारा 251, चंद्रपूर 205, नागपूर शहर 187, नागपूर ग्रामिण 189, वर्धा 200, यवतमाळ 250, गोंदीया 217, गडचिरोली 124 तर वाशिम मंडलातील 187 वीजचो-यांचा समावेश आहे.
                       याशिवाय भारतीय विद्युत कायदा 2003 च्या कलम 126 अन्वये 48 लाख 38 हजाराच्या 107 प्रकरणात वीज वापरातील अनियमितता आढळल्या आहेत, यात सर्वाधिक 23 प्रकरणे यवतमाळ मंडलातील तर त्याखालोखाल अमरावती मंडलातील 21 प्रकरणे असून अकोला 5, बुलढाणा 4, भंडारा 12, चंद्रपूर 9, नागपूर शहर 8, नागपूर ग्रामिण, वर्धा आणि गोंदीया मंडलातील प्रत्येकी 7 तर गडचिरोली आणि वाशिम मंडलांतील प्रत्येकी 2 प्रकरणांचा समावेश आहे. तर अनियमित वीज वापराची इतर 1115 प्रकरणातून 18 कोटी 13 लाख 62 हजाराचा अनियमित वीजवापर उघडकीस आणण्यात भरारी पथकाला यश मिळाले आहे. यात अकोला मंडलातील 115, अमरावती मंडलातील 71, बुलढाणा 33, भंडारा 116, चंद्रपूर 106, नागपूर शहर 162, नागपूर ग्रामिण 150, वर्धा 58, यवतमाळ 71, गोंदीता 97, गडचिरोली 38 तर वाशिम मंडलातील 98 प्रकरणांचा समावेश आहे.
                या सर्व 2482 प्रकरणांतून एकूण 29 कोटी 59 लाख 76 हजार रुपये मुल्यांकनाची वीज वापरातील अनियमितता आणि वीजचोरी उघडकीस आली असून त्यापैकी 20 कोटी 14 लाख 21 हजार वसुल करण्यात महावितरणला यश मिळाले आहे. संपुर्ण वर्षभर राबविण्यात आलेल्या भरारी पथकाच्या या कारवाईत डोंगरवार, डी. बारापात्रे, एस. कुथे, ए. ओझा, एस. दास, व्ही. नवघरे, एस. हेडाऊ, एस. कन्नाके, डी. नागपूरकर, एस. पेगलपट्टी, आर. हस्ते आणि एस. देशमुख यांचा सहभाग होता. 



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.