रामटेक तालुक्यांतील देवलापार पोलीस ठाणे हद्दीत देवलापार गोरक्षण समोर भरधाव वेगाने व टाटा सुमो या वाहनातून सहा गायी नेत असंतांना गाडी व गायी असा मुद्देमाल पोलीसांनी हस्तगत केला मात्र या सुमोचा चालक पळून गेला.
याप्रकरणी सविस्तर वृत्त असे की,देवलापार पोलीसांनी भरधाव टाटा सुमोत गायीची वाहतूक करीत असलेल्या
चालकास थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने भरधाव वाहन पळविले नंतर तो थांबला व पाठलागावर असलेल्या पोलीसांना येण्यापुर्वीच तिथून पळून गेला. दिनांक 28 मार्च 2018 रोजी ही घटना घडली.देवलापार पोलीसांनी टाटा सुमो क्रमांक एम.पी.50.डी.0305 याला थांबण्याचा ईशारा दिला असतां तो सरकारी पोलीस जीपला डाव्या बाजुने धडक देवून भरधाव वेगाने समोर गेला. लगेच त्याचा पठलाग केला मात्र पुढे जावून त्याने आपले वाहन गोरक्षणसमोर ठेवून पळून गेला.
पोलीसांनी सुमो व सहा गायाी ताब्यात घेतल्या आहेत.याप्रकरणी आरोपीवर प्राण्यांना निर्द्रयतेने वागवणे व महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम व अन्य कलमांखाली अज्ञात चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी देवलापार पोलीस अधिक तपास करीत आहेत.