Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, फेब्रुवारी ०६, २०१८

वाहतूक सिग्नल निद्रावस्थेत ; पालिकेचे दुर्लक्ष

चंद्रपूर/प्रतिनिधी: 
चंद्रपूर करांना शिस्तीचे धडे देण्यासाठी आणि वाहतुकीला नियंत्रीत ठेवण्यासाठी गेल्या दीड- दोन वर्षा आधी गंजलेले वाहतूक सिग्नल काढून नवीन सिग्नल बसविण्यात आले. या नवीन सिग्नल बसविण्याचा कार्यक्रम टप्प्या टप्प्याने पूर्ण करण्यात आला. मात्र शहरातील बंगाली कॅम्प परिसरात नवीनच लागलेला  उभा असलेला सिग्नल गेल्या १५ दिवसांपासून गाड झोपलेल्या अवस्थेत दिसून येत आहे,  त्यामुळे शहरातील अत्यंत दळवळीच्या ठीकानीची सुरक्षा हि वाऱ्या असलेल्याचे चित्र समोर येत आहे. 

बंगाली कॅम्प परिसर हा चंद्रपूर शहरातील अत्यंत वर्दळीचा मार्ग म्हणून ओळखला जातो,  या सिग्नलवर  दिवसातून जळपास १२ तास मार्ग सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांची आवश्यकता असते, हाच मार्ग चंद्रपूर जिल्ह्यातून चौफेर जातो.त्यामुळे या चौकाची सुक्षेवर अत्यंत कटाक्षाने लक्ष असणे आवश्यक आहे, अन्यथा अपघात घडून येण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही. मात्र गेल्या १५ दिवसांपासून या चौकातील सिग्नल हा पडलेल्या अवस्थेत असल्याने याकडे वाहतूक पोलीस व महानगर पालिकेच्या देखरेख विभागाचे लक्ष नसल्याचे दिसत आहे.हा चौक अत्यंत वर्दळीचा असल्याने नेहमी या ठिकाणी जीवघेणे अपघात घडत असतात त्यामुळे इतके दिवस उलटून सुद्धा याकडे वाहतूक पोलीस व महानगर पालिकेच्या मेंटनन्स विभागाचे लक्ष गेले नाही का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

या चौकात दररोज २ वाहतूक पोलीस आपले कर्तव्य बजावतात मात्र या दोन्ही कर्मचाऱ्यांनी आपल्या अधिकार्यांना या संबंधीची तक्रार न केल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे, त्यामुळे आणखी किती दिवश हा सिग्नल निद्रावस्थेत असणार आहे. असा सवाल बंगाली कॅम्प परिसरातील नागरिक करत आहे. शहरातील संपूर्ण सिग्लन्सच्या देखभालीचे काम चंद्रपूर शहर महानगरपालिकेकडे असून त्या सिग्नलवर कर्तव्य बजावत असलेल्या वाहतूक शिपायाचे देखील याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.

PI S.P.CHAVHANया संपूर्ण प्रकाराबाबद मला काहीही माहिती नाही व कोणी तक्रार सुद्धा केली नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती घेऊन या बाबदची रीतसर कारवाई करण्यात येईल.असे असल्यास महानगर पालिकेला पत्राद्वारे कडविन्यात येईल.   
एस.पी.चव्हाण 
वाहतूक पोलीस निरीक्षक, चंद्रपूर .
















SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.