देशात गोहत्या कायदा लागू झाला तरी सुद्धा जनावरांची तस्करी मात्र सुरूच आहे. अश्याच तस्करी करणाऱ्या
४० जनावरांची अतिशय निर्दयपणे कोंबून वाहतूक करणाऱ्या दोन ट्रकमधील ४० जनावरांना पोम्भूर्णा पोलिसांनी जीवदान दिले आहे. यात ट्रक चालकासहित दोघांना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे.
पोंभुर्णा पोलीस स्टेशन चे ठाणेदार व शिपाई अविनाश झाडे याना पोंभुर्णा पोलीस स्टेशन हद्दीतून अवैध रित्या जनावरांची वाहतूक करणारे २ ट्रक जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्या आधारे सापळा रचत MH 40. AK. 3480 व TS.20 .T.1612 या वाहनात ४० जनावरे जात असून त्यांचा पाठलाग करत हे जनावरे जप्त केली. व त्या जनावरांना पोंभुर्णा येथील नगरपंचायतीच्या कोंडवाळ्यात जमा केली. हे जप्त वाहन पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आले आहे . या जनावरांची किंमत ३ लाख २० हजार रुपये इतकी सांगण्यात येत आहे. व ११ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत ३ आरोपींना अटक केली आहे. यात बंडू देवराव दुबे (४९) शेख युसूफ (३४) दोघेही बल्लारपूर शेख सलील शेख (२६) रा. गोयेगाव जिल्हा आदिलाबाद येथील रहिवासी आहे. वसीम नामक आरोपी फरार आहे. यांच्या विरोधात पोलिसांनी कलाम ५(1),अ९,११ प्रा स कायदा सण १९७६ सुधारित कायदा २०१५ सहकलम ११ (१)(ड) प्राण्यास निर्दयपणे वागविणे सण १९६० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खचाखच भरलेल्या ट्रक मध्ये एक जनावर मृत अवस्थेत आढळल्याने अमानुष वाहतुकीचे रूप समोर येत आहे. मागील महिन्यात देखी ५० जनावरांसह २ ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्या पाठोपाठ सोमवारी ४० जनावरांसह २ ट्रक ताब्यात घेतल्याने जनावरांची तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.