आरोग्य तपासणी,रक्तदान,मीरवणूक व साग्रसंगीत कार्यक्रमांचे आयोजन.
रामटेक तालुका प्रतिनिधी:महाराष्ट्राचे आराध्य दैवत व स्वराज्यसंस्थापक, जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव रामटेक शहर व तालुक्यांत ठिकठिकाणी अतिशय उत्साहांत व थाटांत संपन्न झाला.यानिमीत्ताने विविध संस्था,संघटनांच्या वतीने आरोग्य तपासणी,रक्तदान,मीरवणूक व साग्रसंगीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यांत आले होते.
रामटेकच्या धार्मिक रामतलाई मैदानावर शिवस्पर्श प्रतिष्ठान व समर्पण हॉस्पिटल अॅंड रिसर्च इन्स्टिटयूट च्या वतीने भव्य आरोग्य तपासणी व औषध उपचार शिबिराचे आयोजन करण्यांत आले होते. माजी आमदार
अॅड.आशिष जयस्वाल यांनी दिपप्रज्वलन केले.माजी नगराध्यक्षा नलिनी चौधरी,नगरसेवक सुमीत कोठारी,माजी नगरसेवक बिकेंद्र महाजन,विवेक तुरक,संजय झाडे ,शिवस्पर्श प्रतिष्ठाणचे राम राउत,कमलेश शरणागत ,राहुल खरकाटे,रोहीत सेलोकर,अक्षय घोडाकाडे,राज मेश्राम ,हर्षल कांक्रेडवार व प्रतिष्ठानचे सर्वच कार्यकर्ते
मोठया संख्येत उपस्थित होते.राम डेव्हलपर्स,मोठी गडपायरी मित्र परीवार,धनुर्धारी गणेष उत्सव मंडळ व राजे गृप च्यासर्व सदस्यांनी यासाठी सहकार्य केले.स्वराज्य संघटनेच्या वतीने रक्तदानाचा कार्यक्रम संपन्न झाला.
सायंकाळी शिवस्पर्श ,शिवसेना यांचे वतीने बसस्थनकापासुन भव्य मीरवणूक काढण्यात आली.बजरंग दल,राश्टिंय गौरक्षा संगठन यांचेवतीने गांधी चौकात महाप्रसादाचे वितरण करण्यांत आले.भारतीय जनता पक्षाच्या वतीने रामटेकच्या बसस्थानक चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या ठिकाणी उभारला जाणार आहे तिथे सकाळी 11 वाजता संरक्षक भिंत बांधकामाचे भुमीपुजन आमदार डी.मल्लिकार्जुन रेड्डी यांचे हस्ते,नगराध्यक्ष दिलीप देशमुख यांचे अध्यक्षतेखाली व नगरसेवकांच्या उपस्थितीत करण्यांत आले.याच ठिकाणी सायंकाळी ‘शिवकल्याण राजा हा महारांजांचा जन्मापासून ते राज्याभिशेखापरीयंत चा जिवनपट उलगडून देणारा संगीतमय कार्यक्रम संपन्न झाला.मनसर,मसला या गावामध्येही कार्यक्रम झालेत.
चंद्रपूर येथे शिव जयंती साजरी
रयतेचे आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराजांची ३८८ वि जयंती युथ पॉवर फाऊंडेशनच्या वतीने साजरी करण्यात आली. सोमवारी ( ता. १९ ) इंदिरा नगर गायत्री चौक येथे सायंकाळी ६ वाजता शिवजयंती कार्यक्रम पार पडला. यावेळी मनोज पोतराज, नंदकिशोर जोगी, घनशाम अस्वले, सत्यम रामटेके, आबाजी पवार, दीपक पावडे, आशिष तुरांकर, खुशाल ढवस, पवन गोहणे, मनीष शेख, चेतन डाहुले, समीर जाधव, अंकित बोबडे, चिंटू चिमुरकर, श्रवण जोगी, नदणी जोगी, राखी चिमुरकर यांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी महाराजांच्या कार्याबद्दल नागरिकांना मार्गदर्शन केले. यावेळी इंदिरा नगर येथील शेकडो लोकांची उपस्थिती होती.