नवरगाव/प्रतिनिधी:
सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथील अचानक गायब झालेल्या ६ शालेय मुलींचा शोध बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास लागला असल्याची माहिती आहे.सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथील ६ मुली या
मंगळवारी शाळेत गेल्या संध्याकाळी त्या घरी परतल्या दफ्तर ठेवल्या व कुणालाही न सांगता घराबाहेर पडल्या. सायंकाळला घरी शाळेचा दफ्तर ठेवून घराबाहेर गेल्या.रात्र होऊन सुध्दा त्या घरी न परतल्यामुळे त्यांच्या पालकांनी सिंदेवाही पोलीसांना या बाबद्ची माहिती दिली.संपूर्ण रात्रभर या मुलींचा त्यांच्या गावात ,नातलगांकडे व संबंधित ठिकाणी शोध घेण्यात आला.या सोबतच पोलिसांचा डॉग स्कॉड देखील कामाला लागला होता. याच्या शोधासाठी गावात दवंडी हि पिटली गेली. मात्र रात्रभर त्यांचा काही थांब पत्ता लागला नाही.मात्र दुसर्या दिवशी त्याचा सुगावा सकाळी ८ च्या सुमारास लागला.
यात पायल मडावी (वय 15), दिक्षा मडावी (8), स्नेहा मडावी (9) प्रियंका मडावी (6), रूतीका मडावी (9), श्नावणी मडावी (8) असे या बेपत्ता झालेल्या मुलींची नाव असून या मुली अंगणवाडी, जि.प.शाळा व खाजगी शाळेत शिकत होत्या. आज बुधवार सकाळला आठ वाजताच्या सुमारास त्या मुलीचा शोध लागल्याची माहिती आहे . त्यांना या बाबद्ची विचारणा केली असता. मैत्रिणीकडे कार्यक्रम असल्याने त्या नवरगाव येथील मैत्रिणीच्या घरी गेल्या होत्या. सकाळी ६ वाजता या बाबदची माहिती सिंदेवाही पोलिसांना मिळाली. त्यांनी नवरगाव येथील गांधी चौक येथे आपला सर्च ताफा वडविला व मुलीना त्याब्यात घेतले,मुलींना ताब्यात घेऊन पोलिस संपूर्ण विचारपूस करत आहेत. मिळालेल्या माहिती नुसार कार्यक्रमाला रात्री उशीर झाल्याने त्यांना तिथेच मुक्काम करावा लागल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अचानक पने बेपत्ता झाल्याच्या घटनेमुळे पालक, गावकऱ्याकडून यात नाना प्रकारचे तर्क वितर्क लावले जात होते व या घटनेमुळे गावात चांगलीच खळबळ उडाली होती.