Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जानेवारी १५, २०१८

मनीषा म्हैसकर यांची चंद्रपूर महानगरपालिकेला सदिच्छा भेट..

चंद्रपूर/प्रतिनिधी:
              जगभरातील सर्वात मोठी अशी अशी स्वच्छतेची स्पर्धा भारतात सुरु आहे,दरवर्षी स्पर्धेचे निकष अधिक काटेकोर होत असल्याने स्पर्धेची तीव्रताही वाढत आहे.नागरिकांची यात महत्वाची भूमिका आहे.,त्यामुळे ज्या शहरातील लोकांना त्यांचे  शहर स्वच्छ वाटेल तेच अग्रस्थानी राहील,स्वच्छ सर्वेक्षणासाठी अजून काही कालावधी आहे. 
                त्यामुळे चंद्रपूर मनपा त्याचा योग्य उपयोग करून इतर मोठ्या शहरांना धक्का देण्यात यशस्वी होईल अशी आशा  नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी  चंद्रपूर महानगरपालिकेला दिलेल्या सदिच्छा भेटीत व्यक्त केली .
                   स्वच्छता स्पर्धेच्या प्राश्वभूमीवर काही निवडक शहरांना मा. प्रधान सचिव भेट देत आहेत व त्यांच्याद्वारे केल्या गेलेल्या स्वच्छता कार्यांची पाहणी करत आहेत.यावेळी  महापौर व आयुक्तांद्वारे त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले,याप्रसंगी महापौर सौ. अंजली घोटेकर.उपमहापौर श्री अनिल फुलझेले,स्थायी समिती सभापती श्री.राहुल पावडे, आयुक्त श्री संजय काकडे,अतिरिक्त आयुक्त श्री.भालचंद्र बेहरे,उपायुक्त श्री.विजय देवळीकर, सहायक आयुक्त श्री.सचिन पाटील,श्री धनंजय सरनाईक,शीतल वाकडे,मुख्य वैद्यकीय अधिकारी सौ.अंजली आंबटकर,अधिकारी वर्ग व महानगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.
                                     स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत चंद्रपूर शहर सहभागी आहे.  मागील वर्षी प्रथमच स्वच्छता स्पर्धेत सहभागी होताना शहराने केलेल्या कामगीरीने सर्वांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.स्वच्छतेबाबत चंद्रपूर शहराचा आलेख उंचावत आहे . त्यामुळे प्रधान सचिवांनी शहराला भेट देऊन महानगरपालिकेद्वारे करण्यात येणाऱ्या स्वच्छता कार्यांची माहिती घेतली. याप्रसंगी आयुक्त संजय काकडे यांनी महानगरपालिकेच्या स्वच्छता कार्यांचे प्रेझेंटेशन दिले,मागील वर्षी कुठल्या विभागात मनपा मागे पडली होती,  या वर्षी त्या विभागावर कसे नियोजित काम करण्यात आले,तसेच स्वच्छतेच्या निकषांवर मनपा सध्या काय स्थितीत आहे याबाबत माहिती दिली.
                                      महापौर सौ अंजली घोटेकर यांनी विरोधी पक्षातील नगरसेवकांचे स्वच्छता कार्यात मिळत असलेल्या सहभाग व पाठींब्या बद्दल आनंद व्यक्त केला. मनपाने   मागील वर्षीपेक्षा निश्चितच सरस कामगिरी केलेली आहे,आणि यात सर्व चंद्रपूरकरांचे योगदान आहे. मागील वर्षी पर्यंत कचऱ्याचे ढीग असलेला डम्पिंग यार्ड आज आपण फिरायला जाऊ शकू इथपर्यंत बदललेला आहे.         
                                        याप्रसंगी मनीषा म्हैसकर यांनी  डम्पिंग यार्डला भेट दिली,कचऱ्याच्या विघटीकरणाची व खत निर्मिती प्रक्रियेची पाहणी केली,मनपा कचऱ्याद्वारे खत निर्मिती   करते व अतिशय कमी किमतीत त्याची विक्री करते याचे त्यांनी कौतुक केले. तसेच पूर्वी सार्वजनिक शौचालय असलेले आणि मनपाच्या प्रयत्नांनी अभ्यासिकेत  बदललेल्या अश्या  कोलबास्वामी अभ्यासिकेला भेट दिली व मनपाच्या प्रयत्नांना प्रोत्साहन दिले.         

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.