ब्रम्हपुरी ग्रामीण प्रतिनिधी : गुलाब ठाकरे
ब्रम्हपुरी तालुक्यातील दक्षिण परिसराअंतर्गत मुख्य चारही महामार्गाला वेढलेलेल्या गांगलवाडी अजूनही तालुक्याचा प्रतिक्षेत आहे. ८ ऑगस्ट २०१७ रोजी उपवीभागीय अधिकारी ब्रम्हपुरी यांना तालुका कृति समिति तर्फे निवेदन देण्यात आले असून सहा महीने लोटुन सुद्धा गांगलवाडी तालुक्याच्या प्रतिक्षेत आपले नयन चक्षु उघडून पाहत तालुक्याच्या वनवास कधी संपणार च्या प्रतिक्षेत आहे.
ब्रम्हपूरी तालुक्याचा भौगोलिक क्षेत्र मोठे असल्याने गांगलवाडीला तालुक्याचा दर्जा देण्यात या मागणीला घेवून तालुक्यासाठी मध्यवर्ती ठिकाण व उत्कृष्ट बाजारपेठ, राज्य जिल्हा मार्गावरील मुख्य रहदाचे गाव आहे. गांगलवाडी येथे तीन विविध शाखेच्या बॅंका, तीन हायस्कुल, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, ३३ केव्ही सबसेंटर व महावितरण कार्यालय, कृषी मंडळ कार्यालय, रेव्हणी मंडळ कार्यालय, बाजार समिती, पदवीधर मतदार संघाचा बुथ, शिक्षक मतदार संघाचा बुथ, मदर पीएचसी, पशु वैद्यकीय दवाखाना तीन पीट गिरणी नेटवर्क टॉवर, गँस एजन्सी आदींसह विविध विभागाचे प्रमुख कार्यालय आहेत. तालुक्याच्या दृष्टीने गांगलवाडी हे मध्यवर्ती ठिकाण व कार्यालयासाठी मुबलक जागा अस्तित्वात असल्याने गांगलवाडीला तालुक्याचा दर्जा त्वरित मिळवा अशी मागणी जी. प. सदस्य मा.श्री.प्रमोदभाऊ चिमुरकर यानी व्यक्त केले येत आहे