Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जानेवारी २७, २०१८

ट्रँव्हलच्या धडकेत सायकल स्वार ठार

बाजारगाव/प्रतिनिधी:गजेंद्र डोंगरे
 दि.२७जानेवारी ला अमरावती-नागपूर महामार्ग क्र.सहा जवळील रिलायन्स पेट्रोल पंप जवळ सकाळी ७:१५ च्या सुमारास पीवळ्या रंगाच्या खुराणा ट्रँव्हल्स क्र.MH 40 AT 0275  च्या चालकाने भरधाव व निष्काळजीपणे चालवून सायकल चालकाला जोरदार धडक दिली ह्यामुळे सायकल स्वार(चालक) जीव गमवावा लागला.
     मोरेश्वर दशरथ मारबते वय ५५ वर्षे मु.पो.धामणा(लींगा) हे सकाळी पेठ (काळडोंगरी) येथील शिवारात शेत कामासाठी  सायकलने जात होते,रिलायन्स पेट्रोल पंप जवळ ट्र्ँव्हल्स नी त्यांना जोरदार धडक दिली ह्यात मारबते यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली .त्यांना नागपूर येथे वैद्यकिय उपचारासाठी नेत असता मार्गावरच त्यांचा जीव गेला उत्तरिय तपासणीस म्रुत देह शासकीय वैद्यकिय महाविद्यालय नागपूर येथे नेण्यात आले.
    फीर्यादि म्रुतकाचा मुलगा नामें राजेंद्र मोरेश्वर मारबते वय २५ वर्षे मु.पो.धामणा (लींगा) यांच्या तक्रारी वरून हिंगणा पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली,चौकसी अंती ट्रँव्हल्स चालका विरूध्द कलम २७९,३०४(अ) भादवी RW १८४ मो.वा.का.अन्वये गुन्हा नोंद करून अधिक तपास पो.नि.मोरेश्वर बारापात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार राजु भुक्ते,ना.पो.शी.सोमेश्वर वर्धे, विशाल तोडासे करित आहेत

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.