Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जानेवारी १५, २०१८

नागपूर मेडिकल कॉलेजचे नामांतर कन्नमवार कॉलेज व्हावे

 नागपूर/ प्रतिनिधी: 

                                  दादासाहेब कन्नमवार सी. पी. अँन्ड बेरारचे आरोग्यमंत्री असताना त्यांनी त्याकाळी आशियातील सर्वात मोठा म्हणून उल्लेख असलेल्या नागपूर मेडिकल कॉलेजची पायाभरणी केली. गोरगरीब जनतेला उपलब्ध असलेली आरोग्यसेवा ही त्यांची देण असल्यामुळे नागपूर मेडिकल कॉलेजला दादासाहेब कन्नमवार यांचे नाव मिळालेच पाहिजे, असे स्पष्ट मत वक्त्यांनी मांडले.

                     नागपूर विधानभवनात दादासाहेब कन्नमवार यांची ११८ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एन. आय. टी. विश्‍वस्त भूषण शिंगणे तर प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री अनिल देशमुख, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, उपमहापौर दीपराज मार्डीकर, विधानसभेचे कक्ष अधिकारी मधुकर भडेकर, प्रवीण कुंटे पाटील, डॉ. मनोहर मुद्देशवार, अनिल पाटील अहिरकर, गिरीश कुमरवार, नगरसेवक सुनील हिरणवार, नगरसेवक उज्‍जवला शर्मा, संजय इंदूरकर, सुहासिनी कन्नमवार, रवींद्र आकुलवार, बेलदार समाज संघर्ष समितीचे अध्यक्ष राजेंद्र बढिये उपस्थित होते.
.                                                                             प्रथम प्रमुख मान्यवर व समाज बांधवांच्या हस्ते माजी मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित जिल्हाधिकारी कुर्वे, माजी मंत्री अनिल देशमुख, उपमहापौर दीपराज पार्डीकर यांच्या हस्ते दादासाहेब कन्नमवार दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी समाजसेवक दिनेश गेटमे यांच्याकडून मान्यवरांच्या उपस्थितीत वैभव पारसे, भूषण पारसे या विद्यार्थ्यांना कर्णयंत्राचे वाटप करण्यात आले. तर समाज भूषण पुरस्काराने रुबिना पटेल, किसन हटेवार, दिनानाथ वाघमारे, प्रमोद काळबांडे, दादाराव दाभाडे, महादेवराव सिंगलवार यांना गौरविण्यात आले.
                                                                           प्रास्ताविक मुकुंद अडेवार यांनी केले. संचालन खिमेश बढिये यांनी केले तर आभार राजेश मारगमवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी राजू चव्हाण, राजेंद्र चवरे, संजय माटे, नामदेवराव बारसागडे, राजेंद्र वांदिले, पुष्पा बढिये, अरुण आकुलवार, विनोद आकुलवार, रतन इंगेवार, सुभाष बोर्डेकर, अरविंद बोमरतवार, अन्नाजी गुंडलवार, प्रेमचंद राठोड, राजू जाजुलवार, सुहास ओचावार यासह समाज बांधवांनी सहकार्य केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.