भीमा-कोरेगाव येथे भीम अनुयायांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा वरोरा शहर कडकडीत बंद करून निषेध व्यक्त केला. यावेळी शहरात शाळा, महाविद्यालये, व्यवसायिक दुकाने बंद ठेवले.
वरोरा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून तहसील कार्यालयाच्या मार्गाने मोर्चा काढण्यात आला. मोर्चा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात पोहचताच जय जय जय जय भीम च्या नाऱ्याने तहसील कार्यालयाचे काही वेळ कामकाज ठप्प झाले होते. यावेळी निदर्शने चे रूपांतर होऊन अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन करण्यात आले. मार्गदर्शनात आम्ही कुठपर्यंत शांती च्या मार्गाने मोर्चे करू. यापुढे आमच्यावर होणाऱ्या हल्ला आम्ही खपून घेणार नाही. महाराष्ट्रच नवे तर संपूर्ण भारत पेटवून देण्याची आमुची ताकत राहणार. भ्याड हल्याच्या मुख्य सूत्रधारला लवकरात लवकर अटक करावी, घटनेचा तपास सी आय डी कडे द्यावा. निवेदन तहसीलदार सचिन गोसामी यांना देण्यात आले. निवेदन देते वेळी सुनील वरखडे, केशव ठमके, डॉ खापणे, काँग्रेस नेते डॉ विजय देवतळे, माजी नगराध्यक्ष विलास टिपले, युवासेना उपजिल्हा प्रमुख मनीष जेठाणी, नगरसेवक छोटू शेख , युवासेना शहर प्रमुख कासिफ खान, बंडू लाभणे, रोशन नकवे, साजिद पठाण, शुभम चिमुरकर, खुशाल मेश्राम, यशवंत साखरे, अमोल डुकरे, राहुल काळस्कर, विनोद चिकाटे, सुनील गायकवाड, रवी डोंगरकर, जि. प. सदस्या सुनंदा जीवतोडे, असिफ रजा, जयंत ठमके, सिद्धर्थ ढोके, रुपेश टिपले, मनोज तेलंग. व सर्व दलित बांधव मोठया प्रमाणात उपस्थित होते. सकाळ पासून शाळा, महाविद्यालये, व्यावसायिकांनीही आपली प्रतिष्ठाने बंद ठेऊन आयोजकांना सहकार्य केले. कटेकोट पोलीस बंदोबस्तात कोणतीही हानी न होऊ द्यायची जीमेदारी राखली आणि शांतते नुसार संपूर्ण वरोरा शहर बंद पाडुन निषेध व्यक्त केला हे विशेष.