चंद्रपूर जिल्ह्यातल्या घुग्घुस येथील घटना
चंद्रपूर/प्रतिनिधी:
घुग्घुस पंचायत समिती सदस्य शालू विवेक शिंदे यांनी आज मंगळवार सकाळी १० च्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. त्या मागील पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपाच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. त्यांनी आत्महत्या का केली या मागचे कारण अद्यापही कळू शकले नसून त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चंद्रपूरला पाठवण्यात आला आहे. त्यांचा ब्युटीपार्लरचा व्यवसाय होता. पुढील तपास घुग्गुस पोलीस करीत आहे.