Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जानेवारी २८, २०१८

मृतक महिलेचा मृत्यूदेह पोलीस चौकीत

शंकरपुर- सहा दिवसापूर्वी झालेल्या अपघातात जखमी महिला नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान सकाळी ४ वाजता मृत्यू झाला. मृत पावलेल्या पार्वता कवडू चौधरी वय ६५ वर्षें हीचा मृतदेह शंकरपुर येथील पोलीस चौकीत आणून ठेवल्याने एकच खळबळ उडाली.
सविस्तर वृत्त असे की, २२ जानेवारीला सायंकाळी ७ च्या सुमारास मृतक पार्वता चौधरी ही भाजीपाल्याच्या पिशव्या घेऊन घराकडे जात होती. त्या दरम्यान येथील शिवाजी चौकात समोरून येणाऱ्या दुचाकीने धडक दिली यात पार्वता चौधरी, दुचाकीचालक मनोज सुखदेव मेश्राम व सोबती अश्विन बापूराव शेंडे जखमी झाले. त्यांना शंकरपुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले मात्र पार्वता चौधरी हिला गंभीर दुखापत झाल्याने तिला नागपूर येथील शासकिय रुग्णालयात हलविण्यात आले.आज पहाटे ४ च्या सुमारास मृत पावल्या.
दरम्यान दुचाकीचालक मनोज मेश्राम वर पोलीस चौकशी करून लपरवाईने वाहन चालविण्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल करून अटक केली व दुचाकी क्र. MH-34 BK-2151 पोलीस स्टेशन ला जमा केली.
शंकर्पू येथे काही महिन्यांपासून येथील पोलीस चौकीतील कर्मचारी कायदा व सुव्यवस्था ठेवण्यात अपयशी असल्याने येथे बेबंदशाही सुरू असून गुन्हेगारी वाढत आहे. त्यामुळे शहरात दारूचे प्रमाण वाढत असल्याने त्यामुळे शंकरपुर येथील सामाजिक स्वास्थ बिघडत चालले आहे. शंकरपुर येथील पोलीस कर्मचारी यांचेवर कारवाई करण्यात यावे यासाठी मृतदेह पोलीस चौकीत ठेवण्यात आले.
दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चिमूर व ब्रम्हपुरी येथिल पोलीस पथकाला पाचारण करण्यात आले आहे. ब्रह्मपुरी चे एसडीपीओ प्रवीण परदेशी यांनी कुटूंबियानशी चर्चा करून शंकरपुर येथील पोलीस कर्मचाऱ्यांना भीशी येथील पोलीस स्टेशन ला पाठवून शंकरपुर येथे नवीन कर्मचारी बोलविण्यात येत असल्याचे सांगून हा प्रकरण शांत करण्यात आले.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.