Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जानेवारी ०५, २०१८

चंद्रपुरात दुर्लभ नाणेसंग्रहाचे प्रदर्शन

Display of rare coins in Chandrapur | चंद्रपुरात दुर्लभ नाणेसंग्रहाचे प्रदर्शन
चंद्रपूर/प्रतिनिधी:


 प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहातील दुर्लभ नाण्यांचा संग्रह आता सोमवार वगळता आठवड्याच्या सहाही दिवस नागरिकांसाठी खुला राहणार आहे. या कलादालनाला विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनाही भेट देता येणार आहे.
स्थानिक प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहातील भारतरत्न लता मंगेशकर कला दालनाला प्रसिध्द इतिहास संशोधक अशोकसिंह ठाकूर यांनी त्यांच्या वैयक्तिक संग्रहातील दुर्लभ नाण्यांचा संग्रह नागरिक तसेच पर्यटकांसाठी भेट दिली आहे. अशोकसिंह ठाकूर यांनी पन्नास वर्षांपासून केलेल्या नाणे संग्रहामध्ये सोने, चांदी, तांबे तसेच जस्तनिर्मित मध्ययुगीन कळा, मुघल, मराठा, ब्रिटीशकालीन दुर्लभ नाण्यांचा समावेश आहे.
येथे येणाºया पर्यटकांना तसेच अभ्यासकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराई रघुजी भोसले-३ च्या काळातील मुलक चांदा या नाण्यासोबतच प्राचिन भारतातील सोन्याचे नाणे, दिनार, माशा, पगोडा अशर्फी पदभटाक, गदायन आणि फनाम आदी नाणे पाहता येतील.
या कलादालनाचे वैशिष्टय म्हणजे चंद्रपूरातील युवा चित्रकार प्रविण कावेरी यांचे चंद्रपुरातील आगळयावेगळया शेलोतील विविध ऐतिहासिक वास्तुंचे चित्र प्रदर्शन लावण्यात आले आहे. हे प्रदर्शन सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत तर दुपारी ३ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. तर रविवारला सुरु व सोमवारला बंद राहणार आहे. कलादालनातील नाणे व संग्रह चित्रप्रदर्शन म्हणजे पर्यटकासाठी एक कलात्मक मेजवानी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी या प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी, असे प्रशासनाने कळविले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.