Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जानेवारी २४, २०१८

क्रिमिलेअरच्या नावाखाली ओबीसींची फसवणूक

OBC fraud charges in the name of Crimilier | क्रिमिलेअरच्या नावाखाली ओबीसींची फ सवणूकचंद्रपूर/प्रतिनिधी:
ओबीसींच्या हितासाठी भारतीय संविधानात मूलगामी तरतुदी करून विकासाची संधी उपलब्ध करून दिली़ मात्र, आतापर्यंतच्या राजकर्त्यांनी ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणातील १५ टक्केदेखील अंमलबजावणी केली नाही़ या समाजात फु टीरतेची बिजे पेरुन दिशाभूल केली़ आता क्रिमिलेअरच्या नावाखाली फ सवणूक सुरू असून त्याविरुद्ध देशव्यापी आंदोलने गरजेचे आहे, असे मत राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे माजी अध्यक्ष तथा आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे निवृत्ती न्यायमूर्ती व्ही़ ईश्वरैया यांनी व्यक्त केले़ राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि चांदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने जनता महाविद्यालयाच्या प्रांगणात सोमवारी आयोजित जाहीर व्याख्यानात ते बोलत होते. 
                    अध्यक्षस्थानी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्राचार्य डॉ़ बबन तायवाडे तर मंचावर महासंघाचे समन्वयक डॉ़ अशोक जीवतोडे, महासचिव सचिन राजूरकर, प्रतिभा जीवतोडे, इको- प्रो संस्थेचे बंडू धोतरे आदी उपस्थित होते़ निवृत्त न्यायमूर्ती ईश्वरैया म्हणाले, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर, डॉ़ पंजाबराव देशमुख यांच्यासारख्या लोकशाहीनिष्ठ महापुरुषांनी ओबीसींच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकासासाठी मोठे योगदान दिले़ व्ही़ पी़ सिंग यांनी मंडल आयोग स्थापन करून ओबीसींच्या हक्कांना घटनात्मक संरक्षण दिले़ मात्र, सर्वच राजकीय पक्षांनी केवळ मतांचे राजकारण ओबीसींवर अन्याय केला़ सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे बजावले होते, की क्रिमिलेअर लागू करून अंमलबजावणी झाली नाही; तर ओबीसींना दिलेल्या घटनात्मक सोईसवलतींवर गदा येईल़ सध्याची ओबीसीविरोधी धोरणे बघितल्यास सर्वोच्च न्यायालयाचा इशारा खरा ठरत आहे, असे ते म्हणाले. डॉ़ डॉ़ बबन तायवाडे, सचिन राजूरकर यांनी मनोगत व्यक्त केले़

डॉ़ अशोक जीवतोडे यांनी जाहीर व्याख्यानाची भूमिका विशद केली़ निवृत्त न्यायमूर्ती ईश्वरैया व पर्यावरणवादी कार्यकर्ते बंडू धोतरे यांचा सत्कार करण्यात आला़. 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.