Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जानेवारी ०२, २०१८

वीज उपकेंद्राच्या २ ट्रान्सफॉर्मरला भीषण आग


चंद्रपूर/प्रतिनिधी : चंद्रपूर येथील वरोरा २२० केव्ही वीज उपकेंद्राच्या  ट्रान्सफॉर्मरला सोमवारी रात्रीच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत वरोरा २२० केव्ही वीज उपकेंद्राचे २  ट्रान्सफॉर्मरमध्ये भीषण स्फोट झाले आणि त्यामुळे संपूर्ण परिसर हादरला. थंडीच्या दिवसात  ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत कोणतीही माहिती सध्यातरी मिळू शकली नाही . 

  • या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु झाले.हि आग जवळच अ सलेल्या मुख्य उपकेंद्रापर्यंत पोहचू नये म्हणून वीज कर्मचाऱ्यांनी तत्काळ वीजपुरवठा खंडीत केला. त्यामुळे मोठी दुर्घटना टाळण्यास मदत झाली.
  • आगीचे स्वरूप इतके हि भयानक होते कि हि आग वीजविण्यासाठी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना मंगलवारी सकाळी ६ वाजेपरीयंत मेहनत घ्यावी लागली.
  • या लागलेल्या भीषण आगीमुळे परिसरातील जवळपास ३० ते ३५ गावांचा वीजपुरवठा खंडीत झाल्याची माहिती आहे तर महापारेषण विभागाचे लाखोंचं नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे
  • हा संपूर्ण वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी जवळपास ३६ तासांचा अवधी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सध्या घटनास्थळी ऊर्जाविभागाचे बडे अधिकारी पोहचले असून हि आग नेमकी कशामुळे लागली याचा तपस सुरु आहे.Chandrutur electricity sub-station severe fire, | चंद्रपूरात वीज उपकेंद्रात भीषण आग, ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटाने परिसर हादरला

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.