चंद्रपूर/प्रतिनिधी :
चंद्रपूर जिल्ह्याची ओळख बनलेल्या चंद्रपूर प्रीमीअर लीग (CPL) या लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेला बुधवारपासून स्थानिक पोलिस फूटबॉल मैदानावार सूरवात झाली. या प्रसंगी ज़िल्हयाचे अप्पर पोलिस अधीक्षक हेमराज राजपूत , जिल्हा सहकारी बैंकेचे अध्यक्ष मनोहर पाउनकर,श्रमिक पत्रकार संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनील देशपांडे यांच्या उपस्थितित सीज़न ५ च्या CPL चे उद्घाटन थाटात पार पडले. आज पासुन २८ जानेवारीपर्यंत ही स्पर्धा खेळविली जाणार आहे. या स्पर्धेमध्ये १० टीम असुन २५६ खेळाडु चा सहभाग आहे. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक १ लाख आणि द्वितीय पारीतोषिक ६१ हजार रूपयांचे आहे. याशिवाय वैयक्तीक पारितोषिकेही यात देण्यात येणार आहेत. आयपीएलच्या धर्तीवर प्रत्येक संघाला वेगवेगळया रंगाचे पोशाख देण्यात आले असुन. स्पर्धा निकोप व्हावी, यासाठी आंधप्रदेश क्रिकेट असोसिएशनचे अंपायर बोलावण्यात आले आहेत. ही स्पर्धा पांढ-या बॉलने खेळवली जात असून दिवसाला दोन मॅच होनार आहे.या स्पर्धेचे लाईव्ह अपडेट सीपीएलच्या फ़ेसबुक पेजवरही उपलब्ध करण्यात आले आहे.