Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जानेवारी ३१, २०१८

विरोधकांच्या गदारोळाणे गाजली मनपाची आमसभा

चंद्रपूर/ प्रतिनिधी:
चंद्रपूर मनपाच्या नगरोत्थान निधीचा वाद संपता संपेना बुधवारी मनपाच्या सभागृहात आमसभेचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी नगरोत्थान निधीचा विषय, अंबुजा कंपनी कचरा प्रक्रिया विषय, सराई मार्केट या विविध विषयांवर सभागृहातील वेलमध्ये जाऊन चांगलाच गदारोड बघायला मिळाला. सत्ताधार्यांनी नगरोत्थान निधी स्वत:च्या प्रभागात पळविळ्याचा आरोप बसपा गटनेता अनिल रामटेके यांनी केला आहे, यात विरोधकांनी वेलमध्ये येऊन संपूर्ण पदाधिकार्यांसमोर ठिय्या देत तीव्र निषेध नोंदविला.

राज्यसरकारकडून प्रत्तेक वर्षी शहरातील प्रभागाच्या विकास कामांसाठी नगरोत्थान निधी देण्यात येतो. या नगरोत्थान निधीचे समांतर वाटप हे प्रत्तेक नगरसेवकाला द्यावे लागते.  यावेळी देखील ८ कोटी  ७५ लाख २० हजार ७०० रुपयांचा निधी महापालिकेला मिळाला होता . निधीच्या वाटपासाठी महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, स्थायी समिती सभापती राहुल पावडे आणि गटनेता वसंता फुलझेले यांचा समावेश असलेली समिती गठीत केली होती. समितीकडून निधीचे समान प्रमाणात वाटप होईल, अशी सर्व नगरसेवकांना आशा होती. मात्र, पदाधिकाऱ्यांनी स्वत:च्या प्रभागात अधिकाधिक निधी ठेवून घेत काही नगरसेवकांना लाखो रुपयांची कामे दिली गेली. तर, अनेक प्रभागात निधी देण्याचा समितीला विसर पडला. त्यामुळे सत्ताधारी भाजप नगरसेवकांसह समर्थन देणारे मनसे, सेना, अपक्ष नगरसेवक आणि बसप नगरसेवकांत तीव्र संताप व्यक्त केला   . सत्ताधार्यांनी सत्तेतील अधिकाराचा गैर फायदा घेत या नगरोत्थान निधीच्या वाटपाच्या समितीतील सदस्यांनी ७० टक्के निधी हा आपल्याच प्रभागात वडता केला व ईतर नगरसेवकांना कमी प्रमाणात निधीचे वाटप करण्यात आले.  त्यामुळे उर्वरित सत्तेतील व विरोधातील काही नगरसेवकांनी सभागृहात चांगलाच गदारोळ घातला. महापौर अंजली घोटेकर यांनी विश्राम गृहात नाराज गटनेत्यांची बैठक घेतली होती व त्यांना नगरोत्थान व दलित वस्तीतील ४० टक्के कामे देण्याचे आश्वासन दिले होते मात्र हे आश्वासन पूर्ण न झाल्याने आज विरोधकांनी मनपाच्या सभागृहात चांगलाच गोंधळ घातला, यात बसप गटनेते अनिल रामटेके,पप्पू देशमुख ,पुष्पा मून, रंजना यादव, लक्ष्मी कारंगल, पितांबर कश्यप, धनराज सावरकर, बंटी परचाके,प्रदीप डे,  व अन्य नगरसेवकांनी संताप व्यक्त करत चांगलाच गदारोळ घातला. या आधीही नगरोत्थान निधीच्या वादावरून उपमहापौर अनिल फुलझेले आणि भाजपचे नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांच्यात  चांगलीच शाब्दिक झाली होती.

मनपाच्या आमसभेत पप्पू देशमुखांचे "अंबुजा गो बॅक"
बुधवारी झालेल्या मनपाच्या आमसभेत अंबुजा सिमेंट कंपनीला चंद्रपूर शहराच्या कंपोस्ट डेपोतील कचरा देण्याचा विषय अजेंड्यावर होता. शहर विकास आघाडीचे गटनेते तसेच प्रहार संघटना जिल्हाध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांनी या संदर्भात एक पत्र देखील महापौर अंजली घोटेकर यांच्या नावे लिहले होते. उपरवाही ग्रामसभेने अंबुजामध्ये प्लास्टिक व कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येते.यामुळे दुर्गंधी व अनारोग्य पसरत असल्याने कंपनीविरोधात कारवाई करण्यात यावी असा ठराव उपरवाही ग्रामसभेत घेण्यात आला होता.या ठरावाची प्रत देशमुख यांनी महापौर यांना दिलेल्या तक्रारीसोबत जोडलेली होती.या तक्रारी च्या प्रत देशमुख यांनी सर्व नगरसेवकांना देऊन सहकार्य करण्याची विनंती सुध्दा केली होती.चंद्रपूर मनपाचे सर्व पदाधिकारी, सदस्य व प्रशासन स्वच्छतेच्या बाबतीत उल्लेखनीय कार्य करीत असतांना अश्या बेजाबदार पाने काम करणाऱ्या व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या तसेच गोरगरीब ग्रामीण लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या कंपनीला प्रक्रीया करण्यासाठी कचरा देणे चंद्रपूर मनपासाठी भूषणावह ठरणार नाही अशी भूमिका नगरसेवक पप्पू देशमुख  त्यांनी मांडली होती. हा विषय आमसभेत चर्चेला आल्यानंतर देशमुख व अन्य काही नगरसेवकांनी अंबुजा "गो बॅक" चे नारे दिले व त्यानंतर सर्वानुमते अंबुजाला कचरा देण्याचा ठराव रद्द करण्यात आला.

वडगाव प्रभागातील दत्त नगरला नगरोत्थानमधून डावलल्याचा निषेध..
शहरातील वडगाव प्रभाग हा एक महत्वाचा प्रभाग गणल्या जातो.वडगाव प्रभागातील दत्त नगरमध्ये 900 च्या वर लोक वास्तव्यास आहे. या प्रभागात गेल्या  20 वर्षापासून रस्ते,नाल्या यासोबतच अनेक विकासकामे झालेली नाहीत.२०१७-२०१८  या वर्षासाठी आलेल्या नगरोत्थानमधेही दत्त नगरला वगळण्यात आले.याचाही नगरसेवक देशमुख यांनी महापौर यांच्या डायस समोर जाऊन निषेध केला.

सराई मार्केटची ईमारत ठाकूर यांच्या संस्थेला देण्यास नगरसेवकांचा विरोध.
चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट येथील महानगर पालिकेच्या मालकीची ६३४९.५९ चौरस मीटर मध्ये असणारी इमारत गेल्या काही वर्षापासून जीर्ण अवस्थेत आहे, जुन्याकाळी हि ईमारत धर्मशाळा म्हणून वापरली जात होती. सध्या हि ईमारत भग्नावस्थेत असल्याने इंडिअन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चर हेरिटेज चालविणाऱ्या ईतिहासकार अशोकसिंग ठाकूर यांनी हि ईमारत त्यांच्या संस्थेला मिळावी यासाठी मनपात २६ डिसेंबर २०१७ ला अर्ज केला होता. अशोकसिंग ठाकूर हे पुरततव जाणकार असून ते विविध विषयांवर प्रदर्शनी भरवित असतात.  मनपाने हा विषयाला २८ डिसेंबरला सर्वसाधारण सभेत मंजुरी देखील प्रधान करण्यात आली होती.  मात्र काही नगरसेवकांनी शासनाची ऐतिहासिक ईमारत एका अशासकीय संस्थेला देण्यात येऊ नये यासाठी विरोध दर्शविला. तर पप्पू देशामुख यांनी या ऐतिहासिक इमारतीला जर मनपा कोणाला देत नसेल तर या ईमारतीला विकसित करत त्यात राणी हिराईचे संग्रहालय बनविण्यात यावे अशी मागणी यावेळी केली. 




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.