Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जानेवारी २२, २०१८

लोकल पकडण्याच्या नादात गेला अभिनेता प्रफुलचा जीव

मुंबई - 
'कुंकू', 'तु माझा सांगती' यांसारख्या मालिकांत अभिनयाची चुणूक दाखविलेला अभिनेता प्रफुल्ल भालेराव याचा आज सकाळी अपघाती मृत्यू झाला. मालाड रेल्वे स्टेशनजवळ त्याचा मृतदेह आढळला. अचानक झालेल्या या अपघाताने सर्वच मराठी इंडस्ट्री हादरली आहे. अभिनेता सुनील बर्वे यांनी प्रफुल्ल यांच्या मृत्यूने ते हेलावले आहेत असे सांगितले. सर्व मराठी इंडस्ट्री यावेळी त्यांच्या दुःखात सामिल असल्याचे सुनील म्हटले.

कुंकू मालिकेत मृण्मयी देशपांडेने सांगितले, "प्रफुल्ल अतिशय गुणी तसेच खोडकर मुलगा होता. कुंकूच्या सेटवर  आम्ही सर्वजण त्याचा अभ्यास घेत असू. इतक्या लहान वयात प्रफुल्लच्या जाण्याने आमच्या कुंकू फॅमिलीला मोठा धक्का आहे. प्रफुल्लने नुकतेच 'बारायण' या सिनेमात काम केले होते. 'बारायण' सिनेमाच्या निर्मात्या दैवता पाटील यांनी "प्रफुल्ल अतिशय अभ्यासू आणि कामात सिन्सिअर असा मुलगा होता असे सांगितले."

असे सांगण्यात येत आहे की, धावत ट्रेन पकडत असताना त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे अभिनय करता करता प्रफुल्ल एका कंपनीत कामही करत होता. नाईट शिफ्ट संपवून तो पहाटे घरी निघाला असताना त्याचा अपघात झाला. अजून या घटनेवर सविस्तर वृत्त कळू शकले नाही.

प्रफुल्लने जानकीचा भाऊ गण्याची भूमिका साकारली होती. याशिवाय 'तू माझा सांगती', 'आवाज- ज्योतिबा फुले','नकुशी' मालिकेतील त्याने साकारलेल्या भूमिकाही लोकप्रिय झाल्या होत्या
धावत ट्रेन पकडताना मृत्यूमुखी पडला मराठी अभिनेता प्रफुल्ल भालेराव, सहकलाकारांनी व्यक्त केले दुःख

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.