आमदार नानाजी शामकुळे यांच्या प्रयत्नाला यश
चंद्रपूर/प्रतिनिधी :
स्मार्ट चंद्रपूर बनविण्याचे दृष्टीने चंद्रपूर येथील बसस्थानकाचे आधुनिकीकरण, सौदरीकरण तसेच दर्जावाढ करण्यासाठी परिवहन मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरवठा करून सुशोभित बसस्थानक तयार व्हावे यासाठी आमदार नाना शामकुळे यांनी वित्त, आणि नियोजन, वने तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मागणी केली. सदर बाब लक्षात घेत राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ११ कोटी १२ लक्ष ७६ हजार ३४० रुपये एवढा निधी मिळवून देण्यात आमदार नानाजी शामकुळे याना यश आले आहे.
चंद्रपुरात शहराच्या मध्यभागी बस्थानाक आहे. येथे अपुऱ्या सुविधा असल्याच्या अनेक तक्रारी प्रवाशी करीत होते. या तक्रारीची दखल घेत आमदार नानाजी शामकुळे यांनी परिवहन मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा करून चंद्रपूर बसस्थानकाचे आधुनिकीकरण, विस्तारीकरण तसेच दर्जावाढ करण्यासाठी प्रयत्न केले होते. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून मंत्रालयात वेळोवेळी परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आल्या होत्या. परिवहन महामंडळाने देखील या मागणीची दखल घेत ११ कोटी १२ लक्ष ७६ हजार ३४० रुपये निधी मंजूर करून दिला. आता काही दिवसातच बसस्थानकाच्या कामाला सुरुवात होणार आहे. चंद्रपूरकराना या बस्थानकामुळे दिलासा मिळणार आहे. चंद्रपूर शहर स्मार्ट होण्याच्या दृष्टीने हे एक पाऊल असल्याचे आमदार नानाजी शामकुळे यांनी मत वेक्त केले.