चिमूर/तालुका प्रतिनिधी
श्री स्वामी नारायण बहुद्देशिय संस्था, गडचिरोली शाखा-भिसी द्वारा संचालीत श्री साई क्लासेस अकॅडमी, भिसी मध्ये क्रिडा, प्रज्ञाशोध व सांस्कृतिक स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले. या कार्यक्रमाचे उदघाटन मा.सतिषभाऊ वारजूकर गट नेते जि.प.चंद्रपूर यांचे हस्ते पार पडले यावेळी डॉ.रमेशजी गजभे, (माजी राज्यमंत्री) रोशन ढोक, (गट नेते पं.स.चिमूर), सुरेशजी टिकले, (अध्यक्ष स्वा.ना.ब.सं. गडचिरोली), योगीता गोहणे (सरपंच भिसी), लिलाधरजी बन्सोड (उपसरपंच ग्रा.पं. भिसी), अरविंदजी रेवतकर (माजी सरपंच भिसी), पंकज मिश्रा (पत्रकार लोकमत समाचार), मनोज डोंगरे, (पत्रकार देशोन्नती), रवींद्र गोगले (पत्रकार महासागर), मा. माळवे सर, मा.दिपक क्षिरसागर, मा. निमजे सर तसेच विध्यार्थी व पालक मोठ्या संख्येत या कार्यक्रमात उपस्थित होते. या प्रसंगी साई क्लासेस मधून निघालेल्या गुणवंत विध्यार्थीनी व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.
तसेच तिन दिवसीय क्रिडा, प्रज्ञाशोध परिक्षा व सांस्कृतिक स्नेहसम्मेलन कार्यक्रमात विद्यार्थी, विद्यार्थीनींनी खो- खो, कबड्डी, क्रिकेट, वादविवाद स्पर्धा, प्रश्न मंजुशा, सामान्य ज्ञान आदी स्पर्धांमध्ये भाग घेतला. सायंकाळी विद्यार्थांनी नृत्य, समुह नृत्य, एकपात्री नाटक, बातमींचे वार्तापत्र सादर करून उपस्थितांचे मन जिंकली.या सम्मेलनाचा समारोप तिसऱ्या दिवशी झाला असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकरपुर येथील पर्यावरण मित्र युवराज मुरस्कर होते. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणुन सरपंच योगीता गोहने, माजी सरपंच अरविंद रेवतकर, प्रा.राजेश सोनकुसरे, जगदीश पेंदाम, पत्रकार शंकरपुर, महेश राखडे,उपस्थित होते. तसेच यावेळी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये प्रथम, व्दितिय व तृतिय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थांना शिल्ड, पदक व प्रमाणपत्र देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालन मोनाली ठाकरे, प्रास्ताविक गनेश गभने तसेच आशिष गभने यांनी उपस्थितांचे आभार मानले. साई क्लासेस अकॅडमीच्या या स्नेहसम्मेलनासाठी निखील पिसे नेरी, श्रध्दा डोईजड, धिरज सर, सरला खोब्रागडे मॅडम, सुधा कुमले, प्रगती चामाटे, ट्वींकल मॅडम, पल्लवी चामाटे, भोयर मॅडम आदिंनी सहकार्य केले.