Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, डिसेंबर १५, २०१७

मतिमंद युवतीवर अत्याचार ;संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात

सिंदेवाही/प्रतिनिधी:
     सिंदेवाही तालुक्यातील गडमौशी येथील २३ वर्षाच्या
मतिमंद युवतीवर लैगींक अत्याचार झाल्याची  घटना समोर आल्याने सर्वत्र खळबळ उडाली. या प्रकरणात युवतीची पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली असल्याची माहिती आहे.मिळालेल्या माहितिवरून नात्यात सावत्र मामा  लागत असलेल्या शंकर यशवंत मंडलवार वय ३१ याने लैंगिक अत्याचार केला असल्याचे सांगण्यात येत आहे .हा संपूर्ण प्रकार तेव्हा समोर आला जेव्हा पिडीत युवती ही गरोदर असल्याची बाब समोर आली  या प्रकरणात आरोपी शंकर यशवंत मंडलवार वय ३१याला सिंदेवाही पोलीसांनी कलम ३७६ (२) (जे) (एल) भांदवी गुन्हा दाखल  केला असून पुढील तपास ठाणेदार मलिकार्जुन इंगडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक खैरकर करित आहेत.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.