Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, डिसेंबर ०३, २०१७

रेल्वेच्या धडकेत सुरक्षा रक्षकाचा मृत्यू

चंद्रपूर/प्रतिनिधी:
 चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात एलिकॉन कंपनीत कार्यरत असलेल्या एका ४४ वर्षीय कामगाराचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. चंद्रशेखर तोंगटीवार(४४) रा.चंद्रपूर असे मृतकाचे नाव असून  ५०० मेगावॅट क्षमतेच्या आठ क्रमांकाच्या संचात सीएचपी वॅगन टिपलरचे काम एलिकॉन कंपनीला देण्यात आले आहे . चंद्रशेखर तोंगटीवार हा  या कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. दरम्यान रेल्वे वॅगन रिकामी करून बाहेर निघत असताना तो रेल्वेखाली आला.  त्याला चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान जो पर्यंत मृतकाच्या नातेवाईकांना मदत मिळत नाही. आणि दोषींवर कारवाई होत नाही तो पर्यंत मृतदेह उचलणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी आणि स्थानिक नागरिकांनी घेतला त्यामुळे काही काळ  घटनास्थळावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर एलिकॉन कंपनीने १ लाख रुपये देण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईका प्रेत उचलण्यास तयार झाले .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.