पारशिवणी /प्रतिनिधी :
रामकृष्णा मठ ,महात्मा नेत्रपेढी,नेत्ररुग्णालय एस.एम.एम.वेलफेयर चैरिटेबल ट्रस्ट नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील धर्मराज विद्यालय कन्हान,कांद्री येथे निःशुल्क मोतीयाबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन ता.३ ला करण्यात आले होते.शिबिराचे उदघाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक चंद्रशेखर झोड यांच्या अध्यक्षतेत पार पडले.प्रमुख अतिथी मध्ये रामकृष्ण मठाचे अध्यक्ष स्वामी ब्रह्मनंद महाराज तपासणी शिबिरात सेवा द्यायला आलेल्या संघात डॉ.प्रणिता साखरकर,डॉ.सुचिता गोरडे,डॉ.वेदांत भारती,महेंद्र सिंग दुलाराव यांची उपस्थिती होती.शिबिरात एकूण २५१ रुग्णांनि तपासणीचा लाभ घेतला तर ७६ रुग्णांची मोतीयाबिंदू शस्त्रक्रिये साठी निवड करण्यात आली.८५ रुग्णांना निःशुल्क चष्मे वितरित करून औशोधपचार करण्यात आला. कार्यक्रमाला संचालन मोहन खेडकर तर आभार विकास देशपांडे यांनी मानले,सुनील लाडेकर,अनिल मेंगर,अशोक राठोड,दिवाकर शेंडे,किरण देवरस,केवल गोरले,उमेश गोरले,अजय भोयर,संजय साखरकर यांनी सहकार्य केले.