Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, डिसेंबर ०६, २०१७

नववीतील विद्यार्थिनीवर अॅसिडफेक

अमरावती : नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर अॅसिडफेक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दोघा तरुणांनी केलेल्या अॅसिड हल्ल्यात विद्यार्थिनी 12 टक्के भाजली आहे.
मंगळवारी संध्याकाळी अमरावतीच्या मालटेकडी परिसरात ही घटना घडली. एकतर्फी प्रेमातून आरोपींनी हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. पीडित विद्यार्थिनी सिद्धार्थनगर भागात राहते.
संबंधित विद्यार्थिनी अमरावतीतील गर्ल्स हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकते. आज संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास दोघांनी तिला गाठून अॅसिड फेकलं. या हल्ल्यात ती 12 टक्के भाजली असून तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.