Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, डिसेंबर २३, २०१७

त्याच्या स्वागतासाठीअख्खे गाव एकवटले

  • वाहनगाव दारू विक्री प्रकरण
  • जिल्हाबंदीनंतर प्रशांत कोल्हे परतले
  •  
चिमूर/तालुका प्रतिनिधी
खुले आम दारूविक्रीचे दुकान सरु करून प्रशासनाची झोप उडवून दिल्याचा प्रकार चिमूर तालुक्यातील वाहनगावं येथे घडला होता या प्रकरणी उपसरपंचाला जबाबदार धरून त्यांना प्रशासनाने ५६दिवसाची जिल्हाबंदी केली होती, अखेर ५६ दिवसाचा वनवास गुरुवारी संपताच वाहनगावचे उपसरपंच प्रशांत कोल्हे गावात दाखल झाले त्यांच्या स्वागतासाठी अख्खे गांव एकवटले होते
एवघ्या २६ वर्षाच्या वयात प्रशांत कोल्हे यांनी गावातील समस्या घेऊन प्रशासनाला धारेवर धरत गावात अनेक विकास कामे करीत ग्रामपंचायतीची निवडणूक लढविली,निवडून येताच गावाच्या पुढारपणाची धुरा मिळाली उपसरपंचाचीधुरा सांभाळत असतांनाच दारुविक्रीने विळखा घातला, गावातून दारू हद्दपार करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेत आंदोलनाची साखळी सुरू केली पोलीस दारूविक्रीत्यावर कारवाई करीत नसल्याने  ग्रामपंचयात खुले आम दारूविक्री करेल असा ग्रामसभेने निर्णय घेतला होता मात्र दारूबंदीच्या ठरावाची अमलबजावणी करताना पोलीस विभाग व तहसिलदार यांनी दिलेल्या सूचनांचे पालन केले नाही म्हणून उपविभागीय अधिकारी चिमूर यांनी २३ आक्टो बरला एक आदेश काढुन उपसरपंच कोल्हे यांना५६ दिवसांसाठी जिल्हाबंदी केली या जिल्हाबंदीचा वनवास बुधवारी संपला त्यामुळे त्याचे गुरुवारी सकाळी वाहणगाव येथे आगमन होताच त्यांच्या स्वागतासाठी अख्खे गाव रस्त्यावर एकवटले होते गावातील अबालवृद्ध महिला, युवक असा संपूर्ण गाव एकत्र येऊन स्वागतासाठी फटाक्यांची आतिशबाजी करीत होते ढोल ताशासह गावातून मिरवणूक काढली त्यामुळे गावात एक मोठा समारंभ असल्याचे जाणवत होते
-------------------------------------------------------
न्यायालयाने फेटाळली होती याचिका
जिल्हाबंदी आदेशयाविरुद्ध नागपूर न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली,मात्र न्यायालयाने कोल्हे यांची याचिका खारीज करून जिल्हाबंदीचे आदेश कायम ठेवला होता त्यामुळे प्रशांत कोल्हे यांनी २३आक्टोबर ते २० डिसेंबर असा ५६ दिवसाचा जिल्हाबंदी वनवास भोगला,

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.