कोंढाळी: गजेंद्र डोंगरे
स्पर्धा परिक्षा असो की सामान्य परिक्षा या साठी मनाची तयारी असावी लागते. त्यातही स्पर्धा परिक्षेत उतरायचे असेल तर त्या साठी जिद्द व चिकाटी अंगी बाळगून स्वता ला शिस्त व वेळेचे नियोजन साधल्यास स्पर्धा परिक्षा कठीन नाही.असे मार्गदर्शन नागपुर जि.प. च्या मुख्य कार्यपालन अधिकारी डाॅ. कादंबरी बलकवडे यांनी स्वतंत्रता सेनानी कै.पा.ना. गावंडे कनिष्ठ महाविद्यालय शीवा येथील विद्यार्थ्याना मार्गदर्शन प्रसंगी सांगितले.
नागपुर जिल्य्हया च्या शीवा येथील कनिष्ठ महाविद्यालयात ग्रामीण आदिवासी भागातील मासोद,अडेगाव,कोंढाळी येथील विद्यार्थ्यांना शलांत परिक्षे नंतर आपले भविष्य घडविन्या साठी कुठ -कुठल्या परिक्षांना सामोरी जावे,त्या साठी लागनारे नियम, या बाबद माहती देन्यासाठी कार्यशाळेचे आयोजन या संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब गावंडे तथा या कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तुषार कोहळे , यांनी केले होते.
या आयोजना साठी सोलार गृप चे चेअरमन सत्यनारायन नुवाल हे अध्यक्ष स्थानी होते.तर!नागपुर जिल्हा पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे(आय.पी.एस.)व डाॅ.कादंम्बरी बलकवडे(आय.ए.एस) हे मुख्य मार्गदर्शक होते. या प्रसंगी शैलेश बलकवडे यांनी आपले मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना सांगितले की आपन आपल्या आवडीचे विषयाला महत्व दिले पाहिजे.आपन शालांत परिक्षे नंतर कोणत्या शाखेचा पदविधर स्पर्धा परिक्षेत बसु शकतो. या साठी आवांतर वाचनाची आवड , वेळेला महत्व , आपल्या जीवनात लक्षांक गाठन्याची चीकाटी अंगी बाळगावी. त्याच प्रमाणे डाॅ.कादंबरी बलकवडे यांनी ही आपले मार्गदर्शनात स्पर्धा परिक्षांचे विषय त्याला असनारे गुण,ती किती टप्यात होते, कसा अभ्यास करावा वेळेचे नियोजन कसे असावे विषेश म्हनजे भ्रमणध्वनी प्रेम कमी असावे ,तसेच अन्य मोलाची माहती दिली.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सत्यनारायन नुवाल यांनी आपले अध्यक्षिय भाषनात सांगितले की विद्यार्थ्यांनी आपले जिवनात आधी संकल्प करावा व त्याला सध्य करन्या साठी कैशल्यशाक्ती अंगी बाळगन्याचे प्रयत्न करत रहावे.यातून संकल्प शक्ती मजबूत होईल. व आपल्या जीवनाचे सार्थक होईल.
या कार्यशाळेत उपस्थित विद्यार्थिनी व विद्यार्थ्य्यनी आपले प्रश्न विचाले, त्या प्रश्नांचे समाधान कारक उत्तरे दोन्ही मार्गदर्शकांनी दिली.आयोजक नानासाहेब गावंडे यांनी ही मार्गदर्शन केले.या प्रसंगी शीवा येथील सरपंच सुनीता ताई बोंबले, सावंगा चे सरपंच प्रवीन पानपत्ते, माया शेलार, गंगाधर गजभिये, सोलार गृप चे महाव्यवस्थापक सोमेश्वर मुंधडा, प्रशाशकिय अधिकारी अशोक राऊत , प्राचार्या दिपमाला बरडे,मुख्याध्यापक मोहण ठवळे, शेंडे सह ग्रामिढ परिसरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते हजर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थि तुषार कोहळे यांनी केले .संचलन सारिका टापरे तर आभार के.जी.वाघमारे यांनी केले. या मार्गदर्शन कार्यशाळेत भाग घेनार्या विद्यार्थ्यां नी सांगितले की आम्हाला अत्यंत मोलाचे मार्गदर्शन मिळाले आहे.ते अंगिकारन्याचा निश्चित प्रयत्न करू.