Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, डिसेंबर ०५, २०१७

मानव-वन्यजीव संघर्ष बाबत प्रशासन व जनता संवाद मेळावा

 चंद्रपूर/प्रतिनिधी:
मार्गदर्शन करतांना श्रीमती नियति ठाकर (पोलीस अधीक्षक चंद्रपुर)
दिनांक 03/12/2017 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी मुल आणि ब्रम्हपुरी यांचे संयुक्त  विद्यमाने ‘‘मानव - वन्यजीव संघर्षा बाबत प्रशासन व जनता संवाद’’ कार्यक्रम मुल येथे आयोजीत करण्यात  आला. सदर कार्यक्रमात श्रीमती नियति ठाकर, पोलीस अधीक्षक चंद्रपुर यांचे अध्यक्षतेखाली उपस्थितांना
दिवसेंदिवस वाढत असलेले वन्यप्राणी यांचे हल्ल्यात होणारी जिवीत हानी  शेतमालाचे नुकसानावर आळा घालण्यासंबधाने मार्गदर्शन करण्यात आले. तसेच हिंस्त्र प्राण्याचे हल्यानंतर गावात निर्माण होणारी परिस्थीती आणि कायदा व सुव्यवस्थेवर वेळीच प्रतिबंध कसे करता येईल यावर कार्यक्रमात उपस्थित गावाचे नागरीक, सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष यांचेशी संवाद साधन्यात आला.
तसेच सदर कार्यक्रमादरम्यान पोलीस अधीक्षक चंद्रपुर यांनी आपल्या मार्गदर्शन कार्यक्रमात
उपस्थित नागरीकांना सांगीतले की, नागरीकांनी आपआपले गावात ग्रामरक्षक दल स्थापन करावे, बिट
अंमलदार व वनविभाग कर्मचारी यांनी गावांमध्ये बैठका घेणे, आणि वन्य प्राण्यांच्या हल्यासंदर्भात गावांच्या
गरजेनुसार योग्य उपाययोजना करण्याबाबत आवाहन करण्यात आले. त्याचप्रमाणे श्री. हेमराजसिंह राजपूत,
अपर पोलीस अधीक्षक चंद्रपुर यांनी आपल्या मार्गदर्शनात  गावकऱ्यांना  माहिती दिली कि, मौजा हळदी, पद्मापुर या गावामध्ये घडलेल्या घटणेसारखे प्रकार पुन्हा उद्भवु नये या करीता गावातील जनतेनी प्रशासनास  सहकार्य करण्याबाबत सांगीतले आणि आपल्या वैयक्तीक मोबाईल नंबरसुध्दा उपस्थित नागरीकांना दिला. तसेच श्री.नरवने, उपविभागीय वन अधिकारी ताडोबा बफर झोन यांनी आपले मार्गदर्शनात सांगीतले की, गावकऱ्यांसाठी सौर कुंपन ही योजना लवकरच अमलात आणण्यात येईल याबाबत उपस्थितांना सांगीतले.सदर कार्यक्रमात श्री. विशाल हिरे, उपविभागीय पो.अधि. मुल, श्री. प्रशांत  परदेशी , उपविभागीय पो.
अधि. ब्रम्हपुरी, श्री. नरवने, उपविभागीय वन अधिकारी ताडोबा बफर झोन, श्री. गजेंद्र हिरे, उपविभागीय वन
अधिकारी मध्य चांदा, श्री. वाकडे, एसीएफ ब्रम्हपुरी विभाग, श्रीमती पुनम धवटे, सहसंस्थापक टायगर रिसर्च
एन्ड कन्झर्वेषन टंस्ट नागपुर, श्री. बंडु धोतरे, अध्यक्ष ईको प्रो सामाजिक संस्था चंद्रपुर, तसेच मुल आणि
ब्रम्हपुरी येथील पोलीस अधिकारी, पोलीस पाटील, सरपंच, तंटामुक्त समिती अध्यक्ष, वनविभागाचे
अधिकारी/कर्मचारी व मुल तालुक्यातील पत्रकार वृंद असे एकुण 850-900 नागरिक मोठया संख्येने उपस्थित
होते. तसेच सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विषाल हिरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मुल, संचालन श्री.
जयवंत चव्हाण, पोनि पोस्टे मुल यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. गायकवाड, सपोनि पोस्टे पाथरी यांनी केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.