चंद्रज्योती-जेट्रोफा बिया लहान मुलांना अधिक संवेदनशील
दरवर्षी ग्रामीण भागातील विदयाथ्र्याना होतेय विषबाधा - जनजागृती साठी मुख्य कार्यपालन अधिकारी यांना निवेदन
चंद्रपूर: ग्रामीण भागात चंद्रज्योतीच्या बिया खाल्याने होणारी विषबाधा संदर्भात इको-प्रो संस्थेच्या वतीने काल (27 डिसे) सिंदेवाही तालुक्यातील नांदगाव या गावात जनजागृती पदयात्रा व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गेल्या अनेक वर्षापासुन चंद्रपूर जिल्हयात तसेच संपुर्ण राज्यात सुध्दा चंद्रज्योतीच्या बिया ग्रामाीण भागातील विदयार्थी खाल्याने विषबाधा होत असल्याच्या बातम्या नेहमीच वृत्तपत्रात छापुन येत असतात. यंदा सुध्दा चंद्रपूर जिल्हयात नागभीड तालुक्यातील कोर्धा, सिंदेवाही तालुक्यातील नांदगांव, रत्नापूर तर चंद्रपूर शहरातील एका शाळेत चंद्रज्योतीच्या बिया खाल्याने शाळेतील विदयार्थाना विषबाधा झालेली आहे. सातत्याने अशा घटना जिल्हा तसेच राज्यात घडत असतांना सुध्दा अजुनही शाळा स्तरावर, ग्रामीण भागात याबाबत जनजागृती नसल्याने वारंवार हया घटना कुठल्या ना कुठल्या गावात घडत असतात.
याकरीता अशाच एका घटनेच्या गावातुन इको-प्रो संस्थेच्या शिक्षण विभाग व आपातकालीन व्यवस्थापन विभाग समीतीच्या वतीने सिंदेवाही तालुक्यातील नांदगाव या गावातील जिल्हा परीषद उच्च प्राथमीक शाळेपासुन जनजागृती अभियान सुरू करण्यात आले. सोबतच नांदगाव गावातुन जनजागृती पदयात्रा सुध्दा काढण्यात आली. या पदयात्रेत शाळेचे विदयार्थी, शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापन समीतीचे सदस्य आणी इको-प्रो चे सदस्य सहभागी झाले होते. रॅली संपुर्ण गावात फिरून विदयार्थी हातात जनजागृती बोर्ड घेऊन घोषणा करीत होते. ‘खाऊ नका, खाऊ नका, चंद्रज्योतीच्या बिया खाऊ नका’ ‘चंद्रज्योतीच्या बिया आम्ही खाणार नाही, कुणाला खाऊ देणार नाही’ अशा घोषणानी संपुर्ण गांव दुमदुमुन गेले होते. यावेळी गावकरी रस्त्याच्या दोन्ही बाजुस जमा झालेले होते, याबाबत कार्यकर्ते सर्व गावकरीना माहीती देत होते.
यावेळी आयोजीत जनजागृती कार्यक्रमात इको-प्रो चे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी चंद्रज्योतीच्या बिया बाबत माहीती देत विदयाथ्र्याना असे कोणतेही फळ जे आपणास नवे आहे किंवा माहीती नसेल अशी फळे खाऊ नये. तसेच शाळेत असतांना शिक्षकांना विचारावे, घरी असाल तर पालकांना विचारल्याशिवाय अनोळखी फळे, वनस्पती खाऊ नये असे आवाहन केले. यावेळी मुख्याध्यापीका व शिक्षण समीतीचे अध्यक्ष यांनी विदयार्थाना मार्गदर्शन केले.
या जनजागृती पदयात्रा दरम्यान बंडु धोतरे अध्यक्ष इको-प्रो संस्था, शाळेच्या मुख्याधापीका सौ सरीता गजलवार, इको-प्रो शिक्षण विभाग प्रमुख रवी गुरनुले, आपातकालीन व्यवस्थापन विभाग प्रमुख अभय अमृतकर, शाळा व्यवस्थापन समीतीचे अध्यक्ष अरूण सहारे, शाळेचे शिक्षक अनील लोणबले, शालीकराम नागापूरे, शालीनी कोचे, सवीता कावडकर, संरपच अर्चनाताई नन्नावरे, माजी संरपच दादाजी नन्नावरे, नांदगाव येथील शाळा समीतीचे सदस्य नम्रता चांदेकर, वर्षा गहाणे, वृंदाताई गहाणे, अर्चना कुमरे पोलीस पाटील जयाताई बोरकर, भगवान मेश्राम यावेळी जनजागृती पदयात्रा व कार्यक्रमात सहभागी झाले होते.
जनजागृती व पदयात्रा कार्यक्रमात इको-प्रो चे नितीन बुरडकर, धर्मेद्र लुनावत, अनिल अडगुरवार, रवींद्र गुरनुले, विजय हेडाऊ, संजय सब्बनवार, सुमीत कोहळे, अभय अमृतकर, राजु काहीलकर, बिमल शहा, हरीश मेश्राम, वैभव मडावी, रोशन धोतरे आदी सहभागी झाले होते.
चंद्रज्योती-जेट्रोफा वनस्पती बाबत
सामान्यपणे चंद्रज्योती, रतनज्योत किंवा रान एंरड म्हणुन ओळखले जाणारे जेट्रोफा हे संपुर्ण भारतातील विशेषतः दक्षिणेकडील भागात आढळणारे एक सदाहरीत वनस्पती आहे. पुर्वीपासुन हे औषधीय उपयोगासाठी वापरले जात होते, पण अलीकडे जैवीक-इंधन म्हणुन प्रोत्साहन दिले जाताना आपण पाहतो. सदर फळ लहान मुलांना परीणामकारक ठरले आहे. सर्वत्र या फळाच्या सेवनाने लहान मुलांना विषबाधा होत असल्याचे दिसुन आले आहे. सदर वनस्पतीचे फळ खाल्यानंतर लहान मुलांना वारंवार उलटया, ओटी-पोटीत वेदना होतात, तोंडातुन फेस येतो.
या सर्व घटना चंद्रज्योती या वनस्पतीच्या बिया पासुन होत आहेत. याचे शास्त्रीस नाव ‘जेट्रोफा कॅरकस’ असे आहे. ग्रामीण भागात मुलांना जेट्रोफा वनस्पतीच्या बिया खायचे फळ असल्याचा गैरसमज आहे. रस्ताच्या कडेला किंवा शाळेमागे, परीसरात झुडुपांसारखे मोठया प्रमाणात वाढलेल्या या वनस्पतीचे फळे आकर्षक असल्याने लक्ष वेधुन घेत असते. शाळेच्या मधल्या सुटीत, किंवा शाळा संपल्यावर उत्सुकता म्हणुन सहजपणे किंवा काजुच्या बिया समजुन लहान मुले ते फोडुन खातात आणी यामुळे या मुंलाना विषबाधा होउन उलटया सुरू होतात, पोटदुखीचा त्रास सुरू होतो. ही सर्व परीस्थीती अत्यंत भितीदायक आणी घाबरवणारी असते. शिक्षक आणी पालक घाबरून त्वरीत मुलांना नजीकच्या प्राथमीक आरोग्य केंद्रात भरती करतात. स्थानीक पातळीवर एवढया साÚया मुलांना एकेवेळी उपचार करणे सुध्दा शक्य होत नाही. डाॅक्टर आणी कर्मचारी सोबतच औषधांची उपलब्धता नसल्याने मोठी तांराबळ उडते. या सर्व अनपेक्षीत घटनेमुळे शिक्षक आणी पालक सुध्दा हादरलेले असतात. अशावेळी, या मुलांना जिल्हा ठिकाणच्या रूग्णालयात पाठवावे लागते. आदी बाबीचा विचार केला तर ग्रामीण भागात चंद्रज्योतीच्या बिया मुंलाकडुन खाल्ले जाणे हीच मोठी समस्या गेल्या कित्येक वर्षापासुन राज्यात सुरू आहे.
जिल्हा परीषद चंद्रपूर कडे इको-प्रो ची मागणी
जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी जितेंद्र पापळकर यांना इको-प्रो तर्फे निवेदन सादर करून चंद्रज्योतीच्या बिया विदयाथ्र्यानी खाऊ नये याकरीता जनजागृती शाळां-शाळात करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत त्यांनी सकारात्मक प्रतीसाद देत यासंदर्भात जिल्हा परीषदेतर्फे त्वरीत कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
संपुर्ण राज्यात व्हावी जनजागृती... बंडु धोतरे
चंद्रज्योती-जेट्रोफा बियाची विषबाधा लहान मुलांकरीता संवेदनशील असुन ते ग्रहण केल्यास विषबाधेस बळी पडतात. चंद्रज्योतीच्या बिया न खाण्याबाबत राज्यातील सर्वच शाळातुन जनजागृती होण्याची गरज असल्याची सांगुन त्याबाबत शासनाने तसे निर्देश राज्यातील सर्व जिल्हा परीषदांना दयावे तसेच ज्या परीसरात सदर वनस्पती असेल तिथे सुध्दा ग्रामपंचायती मार्फत सुचना फलक लावण्याचे निर्देश दयावे अशी मागणी एका निवेदनातुन मा. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री व मा. सुधीरभाऊ मुनंगटीवार, पालकमंत्री तथा अर्थ नियोजन व वनमंत्री यांचेकडे इको-प्रो चे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी केली आहे.