- खासदार सुप्रिया सुळे यांचे नागपूर (खापरी ) येथे प्रतिपादन...
खापरी/प्रतिनिधी
आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ब्लूप्रिंट नको आहे. तर २०१९ मध्ये सत्ता आली आणि राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला तर पहिल्यांदा एस.टी.महामंडळाची सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगतानाच सर्वसामान्यांना न्याय देणारा, विश्वास देणारा आणि जनतेशी नाळ जोडणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निर्माण करुया असा आशावाद खासदार Supriya Sule यांनी नागपूरच्या खापरी गावातील सभेत व्यक्त केला.
देशात सगळयात जास्त कष्ट करणारी आणि अजेंडा बेस असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. पक्षाला सत्ता कशाला हवी हे आत्मचिंतन पक्षाने करायला हवे. पक्षाने आपला अजेंडा काय असावा. राज्यातील सर्वसामान्य जनतेला काय देणार आहोत हे आत्तापासून ठरवायला हवे. नाहीतर उदया क्या हुआ तेरा वादा आपल्या पक्षाला विचारायला नको असा टोलाही सुळे यांनी लगावला.
बुलेट ट्रेन,मोनो रेल यासारखे मोठमोठे विकास होत राहणार आहेत. हा विकास तसा गौण आहे परंतु आपल्याला सर्वसामान्य लोकांना विकासाची दिशा देवूया असे सूचित केले. आपली सत्ता येईल तेव्हा बघू परंतु आपल्याला,आपल्या पक्षाला फार मोठा पल्ला गाठायचा आहे.त्यासाठी पक्ष आणखी मजबुत असणे आवश्यक आहे असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
विदर्भामध्ये कर्जमाफीचा प्रश्न आहेच.पण त्याशिवाय शेतमालाला हमीभाव हा सर्वात महत्वाचा आणि गंभीर प्रश्न आहे. जर कापूस, सोयाबीन, धानाला हमीभाव मिळाला तर विदर्भातील शेतकरी सरकारसमोर हात पसरणार नाही असा विश्वास माजी मंत्री Jayant Patil यांनी व्यक्त केला. #हल्लाबोल पदयात्रेमध्ये पहिल्या दिवसापासून जे लोक पदयात्रेमध्ये चालत आहेत. त्यांचे आभार मानावे तितके कमीच आहेत. यापुढेही संघर्षासाठी प्रत्येक तालुक्यात आपण उतरले पाहिजे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर राहिले पाहिजे असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.
दहाव्या दिवशी नागपूरच्या खापरी गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हल्लाबोल पदयात्रा दाखल झाली. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा Chitra Wagh यांनी हा हल्लाबोल मोर्चा असाच सुरुच ठेवायचा आहे. ही आग आपण महिलांनी अशीच पेटवत ठेवायची आहे असे आवाहन केले.
या सभेला प्रदेशाध्यक्ष Sunil Tatkare ,विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते Dhananjay Munde ,पक्षाचे मुख्य प्रवक्ते Nawab Malik, महिला राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान, माजी मंत्री Anil Deshmukh,माजी मंत्री गुलाबराव देवकर,माजी मंत्री Bhaskar Jadhav,माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, आमदार Hemant Takle आमदार Ranajagjitsinha Patil,आमदार विदया चव्हाण, आमदार ख्वाजा बेग,आमदार Shashikant Shinde,आमदार भाऊसाहेब चिकटगावकर,आमदार जयदेव गायकवाड,आमदार सतिश चव्हाण, आमदार प्रकाश गजभिये,आमदार जयवंत जाधव,आमदार किरण पावसकर,आमदार सतिश पाटील,आमदार नरहरी झिरवळ,माजी आमदार संदीप बजोरिया,माजी आमदार आणि नागपूर जिल्हाध्यक्ष रमेश बंग,माजी आमदार गुलाबराव गावंडे,माजी आमदार सुरेश देशमुख, युवा नेते सलील देशमुख,माजी खासदार आनंद परांजपे, बसवराज नागराळकर-पाटील,नागपूर जिल्हा कार्याध्यक्ष राजाभाऊ टाकसाळे ,महिला जिल्हाध्यक्षा उज्वला बोराडे, यवतमाळ जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले,महिला जिल्हाध्यक्षा क्रांती धोटे-राऊत,वर्धा जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत,महिला जिल्हाध्यक्षा शरयू वांदिले, पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे, ओबीसी सेलचे राज्य प्रमुख Ishwar Balbudhe आदींसह या नागपूर जिल्हयातील पदाधिकारी,कार्यकर्ते,युवक कार्यकर्ते,युवती कार्यकर्त्या, शेतकरी मोठया संख्येने सहभागी झाले आहेत.