Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, डिसेंबर २६, २०१७

निसर्गाची समर्थन लढा देणारी स्त्री अंधश्रद्धा मुळे दुर्बल बनली

  • प्रज्ञा राजूरवाडे
चिमूर/तालुका प्रतिनिधी
निसर्गाने स्त्रीला निर्मितीक्षम बनविले आहे व त्या आंतरिक क्षमतांचा उपयोग तिने जेव्हा तिला संधी मिळाली तेव्हा तिने या संधीचा उपयोग करून आपले कर्तृत्व दाखवून या राष्ट्राची उध्दारशक्ती बनवली परंतु इथल्या काही मनूप्रणित व्यवस्थेने तिचे अस्तित्व कवडीमोलाने केले व तिला दिनदुबळे बनविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महिलांची उन्नती व्हावी यासाठी महिलांचे सम्मेलन घडवून आणावे, त्यांनी आपले विचार, सुख, दुःख मांडावेत त्यांची वाचनालये असावीत जातीभेद, आंध्रश्रद्धा दूर सारून त्या संघटीत व्हाव्यात यासाठी सर्व सोयी पुरुषाकरिता स्त्रियांसाठी सर्व व्यथा हे कोण बोलते शास्त्र आता द्यावे हात झुगारोनी असा इशारा राष्ट्रसंतांनी दिला होता. महिलांचे सबलीकरण व ग्रामगीता या विषयावर श्री गुरुदेव सेवा मंडळ चिमूर क्रांतिभूमी येथे राष्ट्रसंतच्या ४९ व्या पुण्यतिथी निमित्य महिलांच्या सबलीकरणाची अजूनही आवश्यकता का आहे ? हे मांडत असतांना बार्टी समतादूत प्रज्ञा राजूरवाडे बोलत होत्या.
     तसेच या कार्यक्रमाचे उदघाटक चिमूर नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा शिल्पाताई राचलवार तसेच अध्यक्ष नेहरू कनिष्ठ महिविध्यलय चिमूरच्या प्राचार्य श्रीमती रेखाताई जोशीराव मार्गदर्शक म्हणून नगरसेविका छायाताई कंचर्लावार, डॉ शोभाताई नवले, वेणूताई सहारे, रेखाताई शिंगरे तसेच आदी मंचावर उपस्थित होते.
     तसेच प्रज्ञा राजूरवाडे आपल्या मार्गदर्शनात म्हणाले कि, आजही स्त्री भाकडकथा, खोट्या काल्पनिक, निराधार, आंध्रश्रद्धा व जातीयतेच्या मानसिकतेतून बाहेर निघाली नाही म्हणून तिच्या या अज्ञानामुळे तिच्या प्रगतीपथावर असलेली पावले फारशी पुढे न जात जगाच्या जागी सुटून बसली आहे असे प्रकारचे मार्गदर्शन या ठिकाणी " बार्टी समतादूत प्रज्ञा राजूरवाडे बोलत होते."

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.