Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, नोव्हेंबर १८, २०१७

बांधकाम मंत्री येती घरा, लवकर लवकर खड्डे भरा.

चंद्रपूर:(ललित लांजेवार)
कामात कसूर करणाऱ्या नोकरशाहीवर्गाला हल्ली प्रासंगिक, तात्कालिक व पर्यायाने वेळकाढू उपाययोजनांवरच निभावून नेण्याची सवय जडल्याने शासनातील बड्या व्यक्तींचे दौरे अंशत: का होईना 
त्या जिल्ह्यातील जिल्हावासीयांना किंव्हा शहर वासियांना बऱ्याच वेळी लाभदायी ठरतात.
  
असाच काहीसा लाभ चंद्रपूर शहर वासियांना झाला आहे.राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत  पाटील चंद्रपूरच्या दौऱ्यावर आले होते. हे मंत्री महोदय शहरात येणार असल्याची बातमी सार्वजनिक  बांधकाम विभागाला पहिलीपासूनच होती. 15 डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रातील संपूर्ण रस्ते खड्डे मुक्त होणार अशी ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी दिली होती.आपल्या विभागाचे मंत्री जिल्ह्याच्या ठिकाणी बैठकीसाठी येणार असल्याचे बघून गेल्या कित्येक दिवसांपासून तक्रारी केलेले मात्र तक्रारींवर दुर्लक्ष केल्याने तक्रारदारांचे हे खड्डे मंत्रीमहोदयांच्या आगमना प्रित्यर्थ पूर्णतः भरून निघाले. 

शहरातील बसस्थानक परिसर ते रामनगर पोलीस स्टेशन भागात पडलेले मोठमोठे संपूर्ण खड्डे हे अवघ्या काही तासात बनवण्यात आले मंत्रीमहोदय जिल्हाधिकारी कार्यालयात येण्याचा हाचमार्ग होता. त्यामुळे बसस्थानकासमोरील पडलेल्या खड्ड्यांवर रस्त्याच्या मधोमध डांबराची चादरच पांघरण्यात आली. त्यामुळे चंद्रपूरच्या जनतेला अंशतः का होईना बस स्थानक परिसरातील खड्यांपासून मुक्तता मिळाली आहे. मात्र हे खड्डे संपूर्ण शहरात बुजवले नसून मंत्री महोदय ज्या मार्गाने जाणार आहेत त्या ठिकाणचेच खड्डे बुजविन्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.
 यावरून "बांधकाम मंत्री येती घरा, लवकर लवकर खड्डे भरा" ही म्हण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलकाईच्या अभियंत्यांना म्हणणे वावगे ठरणार नाही.

बाहेरचे मंत्री एखाद्या बैठकीनिमित्य ,कार्यक्रमानिमित्य  किंवा एखाद्याच्या भेटीनिमित्य, गावात किंवा शहरात आले  की त्या गावाचा कायापालट दोन दिवसांसाठी का होईना पण होतो. ही बाब अधोरेखितच  होऊन गेली आहे.किरकोळ वा सहजशक्य म्हणवली जाणारी विकासकामे साकारतानाही त्यासाठी बनविली जाणारी ढीगभर कागदपत्रे व त्या कागदपत्रांचा "या टेबलावरून त्या टेबलावरचा प्रवास" अनेकांनी कधी ना कधी अनुभवला असेलच. पण जेव्हा शासनातील एखादी मोठा व्यक्तीचा दौरा असतो  तेव्हा हीच यंत्रणा प्रचलित ‘अ’व्यवस्थांमधून मार्ग काढत अवघ्या दोन-चार दिवसांत वा प्रसंगी काही तासांत आपल्यातील कार्यक्षमतेचा असा काही परिचय घडवून देते की, सामान्य जनतेसाठी तो एकदम चर्चेचा विषय  बनून जातो. 

औदयोगिक शहर म्हणून नावारूपास असलेल्या चंद्रपूर शहराला सध्या खड्यांचे ग्रहण काही नवीन विषय नाही .शहरातून जाणाऱ्या चंद्रपूर-मूल मार्गावर आता परियंत जागोजागी खड्डेच खड्डे बघायला मिळत होते .याच जीवघेन्या खड्यांमुळे अनेक लोक आपला जीव मुठीत धरून  प्रवास करत होते  तर अनेक दुचाकीस्वार या खड्ड्यांमुळे गंभीर जखमी देखील झाले आहेत .गेल्या जानेवारी महिन्यात औद्योगिक क्षेत्रात अग्रक्रमावर असलेल्या टाटा उद्योगसमूहाचे अध्यक्ष रतन टाटा बांबु प्रशिक्षण केंद्राच्‍या सामंजस्‍य करारानिमीत्‍त चंद्रपुरात आले होते. त्यावेळी ह्या मार्गातील खड्डे पूर्णता भरून निघाले होते. पुन्हा ह्या रस्त्याची अवस्था तशीच झाली. अश्या शहरातील रस्त्याची अवस्था बघता मनसेतर्फे आंदोलनही करण्यात आले. काही दिवसांअगोदर मनसेने पंधरा दिवसांचा अल्टिमेट डेट देत बांधकाम अभियंत्यास खड्डे बुजविण्यास सांगितले होते. आठ दिवसांत त्यावर कारवाई करून वाहतूक नियंत्रण शाखेसमोरील संपूर्ण खड्डे हे बुजवण्यात आले.

मात्र प्रश्न असा उद्भवतो की मनसेने आंदोलन केल्यानंतर हे खड्डे बुजवण्यात आले की बांधकाम विभागाचे मंत्री महोदय शहरात येत आहेत म्हणून बांधकाम विभागाने हे खड्डे बुजविले आहेत,हे समजण्यास संभ्रम होत आहे.कारण शहरात सुरु असलेल्या चर्चेवरून मनसे जरी हा  "मनसे इम्पॅक्ट" म्हणून आनंद साजरा करत असेल तरी बांधकाम विभाग मात्र आपल्या मंत्र्याच्या वाहनाला धक्का न लागू देता खड्डे बुजविण्यात व्यस्त दिसून आली. 



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.